उपकेंद्रात बाळंतपण झाले नसल्याने ३२ आरोग्य सेविकांना केले कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:16+5:302021-09-03T04:24:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : गेल्या वर्षभरात आरोग्य उपकेंद्रात एकही बाळंतपण न झाल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील ३२ कंत्राटी आरोग्यसेविकांना ...

32 health workers fired due to non-delivery in sub-center | उपकेंद्रात बाळंतपण झाले नसल्याने ३२ आरोग्य सेविकांना केले कार्यमुक्त

उपकेंद्रात बाळंतपण झाले नसल्याने ३२ आरोग्य सेविकांना केले कार्यमुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आजरा : गेल्या वर्षभरात आरोग्य उपकेंद्रात एकही बाळंतपण न झाल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील ३२ कंत्राटी आरोग्यसेविकांना कार्यमुक्त केले आहे. या आरोग्यसेविकांबरोबर उपकेंद्राची पदेही रद्द करण्यात आली आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात कोरोनासह डेंग्यू, थंडी-ताप, जुलाब, टायफाईड रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रावरच नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. त्यातच आरोग्यसेविकांना कार्यमुक्त केल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रुग्णांची आरोग्य सेवा रामभरोसे झाली आहे. आरोग्यसेविकांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केल्यामुळेच कोरोनाला आटोक्यात आणणे शक्य झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्यामध्ये नर्सिंग कार्यक्रमांतर्गत कंत्राटी आरोग्यसेविका पदांना मंजुरी व वेतन देण्यात आलेले नाही. या अनुषंगाने मागील १ वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील आरोग्यसेविकेची पदे रद्द करून त्यांना कार्यमुक्त करावे तर उपकेंद्राची संख्या रद्द होणाऱ्या पदापेक्षा जास्त असल्यास उपकेंद्राची २०११च्या जनगणनेनुसार यादी तयार करून त्यातील कमीत कमी लोकसंख्या असलेल्या उपकेंद्राची पदे रद्द करावीत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील ३२ कंत्राटी आरोग्यसेविकांना कार्यमुक्त केले आहे.

आजरा तालुक्यातील चिमणे, किणे, साळगाव, आर्दाळ, वडकशिवाले, मलिग्रे, खेडे तर भुदरगडमधील तांब्याचीवाडी, मिणचे बुद्रुक, पांगिरे, चंदगडमधील देवरवाडी, गडहिंग्लजमधील वडरगे, औरनाळ, ऐनापूर, हरळी बुद्रुक, हिडदुगी, गगनबावडामधील माडुकली, हातकणंगले येथील हालोंडी, मजले, कागलमधील अर्जुनवाडा, करवीरमधील सरनोबतवाडी, पन्हाळ्यातील पुशीरे, पिंपळे, उंड्री, आकुर्डे, कसबा ठाणे, राधानगरीतील आसणगाव, अडोली, अनाजे, बारडवाडी, शाहूवाडीतील मांजरे, शिरोळमधील कवठेसार.

Web Title: 32 health workers fired due to non-delivery in sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.