कोल्हापूर शहरात नवे ३२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:21+5:302021-03-04T04:47:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाची लागण झालेल्या ४८ नवीन रुग्णांची नोंद झाली; त्यांपैकी ३२ रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाची लागण झालेल्या ४८ नवीन रुग्णांची नोंद झाली; त्यांपैकी ३२ रुग्ण हे कोल्हापूर शहरातील आहेत. या वाढत्या संख्येमुळे कोल्हापूर शहरात विशेष काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. सलग दुसऱ्या दिवशी मात्र एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, ही त्यातील दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात जेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेव्हापासून कोल्हापूर शहरातील जास्त रुग्ण असल्याचे दिसत आहे. विशेष बाब म्हणजे बुधवारी नोंद झालेल्या ४८ रुग्णांपैकी ४३ रुग्णांच्या कोरोना चाचण्या या खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांत झालेल्या आहेत. हातकणंगले, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण, तर करवीर तालुक्यात तीन रुग्णांची नोंद झाली आहे. सात रुग्ण हे अन्य जिल्ह्यांतून उपचारांसाठी आलेले आहेत.
आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ५५३ वर जाऊन पोहोचली असून, त्यांपैकी ४८ हजार ४४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; तर सध्या ३६७ रुग्ण उपचार घेत आहेत.