३२९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By admin | Published: May 8, 2016 12:53 AM2016-05-08T00:53:38+5:302016-05-08T00:53:38+5:30

चंद्रकांतदादा : खर्चाचे नियोजन करा; जिल्हा नियोजन समितीची बैठक

329 crores sanctioned | ३२९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

३२९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

Next

कोल्हापूर : चालू आर्थिक वर्षासाठी ३२९ कोटी १२ लाखांच्या जिल्हा नियोजन विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराबाई सभागृहात शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यातील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बैठकीस खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार सर्वश्री. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, सत्यजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, सामाजिक व सामूहिक सेवा, ऊर्जा, उद्योग, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवांसाठी तरतुदी आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्णास जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीच्या खर्चाचे आतापासूनच नियोजन करावे, अशी सक्त सूचना करून ते म्हणाले, पहिल्या चार महिन्यांत निधीचा कामनिहाय आराखडा आणि सर्व मान्यता घेण्याच्या दक्षता सर्व विभागांनी घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

Web Title: 329 crores sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.