शिरोळ पालिकेचा ३३ कोटी अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:55+5:302021-02-27T04:32:55+5:30

शिरोळ पालिकेची शुक्रवारी सन २०२०-२१ च्या सुधारीत व सन २०२१-२२ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकास मंजुरी देणेबाबत ऑनलाईन सभा पार पडली. ...

33 crore budget of Shirol Municipality approved | शिरोळ पालिकेचा ३३ कोटी अर्थसंकल्प मंजूर

शिरोळ पालिकेचा ३३ कोटी अर्थसंकल्प मंजूर

googlenewsNext

शिरोळ पालिकेची शुक्रवारी सन २०२०-२१ च्या सुधारीत व सन २०२१-२२ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकास मंजुरी देणेबाबत ऑनलाईन सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, नगरसेवक व विभागप्रमुख उपस्थित होते.

सभेत २ लाख ३५ हजार रुपये शिल्लकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. सन २०२१-२२ चे वित्तीय वर्षाचे अंदाजपत्रक आरंभीचे शिल्लकेसह जमा रक्कम ३३ कोटी ५१ लाख १५ हजार ६४८ व खर्च रक्कम ३३ कोटी ४८ लाख १९ हजार ९८३ रुपये अशा अंदाजपत्रकास मंजुरी देत अर्थसंकल्प पार पडला. अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान यासह विविध विकासकामांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम बनविण्यासाठी सव्वा दोन कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली.

Web Title: 33 crore budget of Shirol Municipality approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.