३३ दात्यांनी केलं रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:42+5:302021-07-05T04:15:42+5:30

कसबा बावडा : मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करून आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयत्न केला, ...

33 donors donated blood | ३३ दात्यांनी केलं रक्तदान

३३ दात्यांनी केलं रक्तदान

Next

कसबा बावडा : मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करून आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयत्न केला, असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. म्हणून नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या ‘लोकमत’च्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिर आज, रविवारी कसबा बावडा -लाईन बझार येथील स्वामी स्वरुपानंद हाॅल येथे घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये ३३ रक्तदात्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

सध्या कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी या शिबिराला व्यापक स्वरूप देण्यात आले असून राज्यभरात रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत. माजी नगरसेविका माधुरी लाड यांच्या हस्ते व हनुमान नागरी पतसंस्था चेअरमन विलास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मनुष्यबळ व प्रशासन व्यवस्थापक संतोष साखरे, वितरण विभाग सहायक व्यवस्थापक भारत माने, शहाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष अतुल परब, तानाजी देसाई, एस.जे. फाउंडेशनचे संदीप जाधव, निवास जाधव, विक्रम चहाचे रणजित पाटील उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अतुल परब यांनी कोरोनाच्या काळात सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. आणि मानवी रक्ताला पर्याय नाही, अशा वेळी ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराचं आयोजन करून खऱ्या अर्थाने वाचकांशी रक्ताचं नातं जोडलं आहे.

रक्तदानासाठी नागरिकांची गर्दी होत होती. बावडा- लाईन बझार बरोबरच परगावाहून ही लोक रक्तदान करण्यासाठी आले होते. या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या ज्ञानशांती रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी विजय जाधव, जयदीप घाडगे, यशोवर्धन जाधव, अमित डोंगरे, आनंदराव चौगुले, रणजित मोहिते, योगेश निकम आदीसह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरासाठी शहाजी तरुण मंडळ, क्षत्रिय फाउंडेशन, युवा ग्रुप व स्वामी स्वरुपानंद सांस्कृतिक हाॅलचे शंभो पवार यांचे सहकार्य लाभले.

---------

या रक्तदान शिबिरमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय रवी भोसले याने ‘लोकमत’मधील बातमी वाचून कामातून वेळ काढून आज रक्तदान केले. तसेच या ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरासाठी प्रचित गाडवे व रवींद्र तेरदाळे हे ५० किमी कवठेसार येथून रक्तदान करण्यासाठी आले होते.

------

वय ४८ रक्तदान ५१ वेळा

शहाजीनगर येथे राहणारे व मंडळाचे सभासद सुधीर व्हराबळे यांनी आज ५१ वे रक्तदान केले.

-------

फोटो कॅप्शन:

‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’च्या वतीने रविवारी कसबा बावडा स्वामी स्वरुपानंद सांस्कृतिक हाॅल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी डावीकडून सनीराज म्हामुळकर, बुध्दिवान कदम, निवास जाधव, अतुल परब, लक्ष्मण गायकवाड, संजय लाड, विशाल माने, माधुरी लाड, निखिल साळसकर, विलास घाडगे, तानाजी देसाई, चेतन जाधव, आकाश साळसकर. समोर रक्तदान करताना अमित डोंगरे. (छाया नसीर अत्तार)

--------------

कसबा बावडा येथील रक्तदान शिबिरामध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय रवी भोसले यांनी ‘लोकमत’मधील बातमी वाचून कामातून वेळ काढून रक्तदान केले.

------------

Web Title: 33 donors donated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.