कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:43 AM2020-09-30T11:43:58+5:302020-09-30T11:44:56+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्हपैकी 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 262 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
कोल्हापूर :जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्हपैकी 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 262 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 894 प्राप्त अहवालापैकी 753 निगेटिव्ह तर 141 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 341 प्राप्त अहवालापैकी 297 निगेटिव्ह तर 44 पॉझीटिव्ह (94 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 151 प्राप्त अहवालापैकी 131 निगेटिव्ह तर 20 पॉझीटिव्ह असे एकूण 205 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
205 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड- 17, चंदगड-15, गडहिंग्लज-4, हातकणंगले- 28, करवीर-27, पन्हाळा- 3, राधानगरी-2, शाहूवाडी-16, शिरोळ-12, नगरपरिषद क्षेत्र- 29, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 46 व इतर शहरे व राज्य 3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
आजरा-785, भुदरगड- 1078, चंदगड- 1007, गडहिंग्लज- 1215, गगनबावडा- 128, हातकणंगले-4839, कागल-1521, करवीर-5109, पन्हाळा- 1704, राधानगरी-1148, शाहूवाडी-1170, शिरोळ- 2296, नगरपरिषद क्षेत्र-6737, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 374 असे एकूण 42 हजार 111 आणि इतर जिल्हा व राज्यातील झ्र 1 हजार 871 असे मिळून एकूण 43 हजार 982 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 33 हजार 297 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 423 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 262 इतकी आहे.