बाहुबलीमध्ये गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा ३३ वा समाधी दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:44+5:302021-08-24T04:29:44+5:30

बाहुबली आश्रम व विद्यापीठचे संस्थापक गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा ३३ वा समाधी दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह संपन्न झाला. ...

33rd Samadhi Day of Gurudev Samantabhadra Maharaj at Bahubali | बाहुबलीमध्ये गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा ३३ वा समाधी दिवस

बाहुबलीमध्ये गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा ३३ वा समाधी दिवस

googlenewsNext

बाहुबली आश्रम व विद्यापीठचे संस्थापक गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा ३३ वा समाधी दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह संपन्न झाला.

यावेळी चातुर्मासासाठी विराजमान असलेले मुनी १०८ श्री अपूर्वसागर महाराज, मुनी १०८ श्री अर्पितसागर महाराज, मुनी १०८ श्री क्षेमसागर महाराज, मुनी १०८ श्री देवधरसागर महाराज, आर्यिका १०५ श्री ज्ञानमती माताजी, आर्यिका १०५ श्री चेतनामती माताजी, आर्यिका १०५ श्री विमुक्तमती माताजी हे त्यागीगण उपस्थित होते.

समाधी दिवसानिमित्त पंचामृत अभिषेक, गुरुदेव समंतभद्र महाराज चरणाभिषेक, गुरुदेव पूजन व समाधी शतक या ग्रंथाचे पठण करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित त्यागींचे आशीर्वचन झाले.

बाहुबली आश्रम व विद्यापीठचे महामंत्री डी. सी. पाटील, संचालक बी. टी. बेडगे, तात्यासो अथणे, अधीक्षक ए. ए. खाडे, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमीनाथ बाळीकाई, अरुण चौगुले, रवींद्र देसाई, बाबगौंडा पाटील, एस. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो-

बाहुबली आश्रम व विद्यापीठचे संस्थापक पूज्य समंतभद्र महाराज यांच्या समाधी दिवसानिमित्त चरणपदुकांचे पूजन करताना संचालक बी. टी. बेडगे व मान्यवर.

Web Title: 33rd Samadhi Day of Gurudev Samantabhadra Maharaj at Bahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.