कोल्हापूर शहरातील व्याधिग्रस्त ३४ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:05+5:302021-05-27T04:26:05+5:30
यावेळी ५ हजार ७०७ व्याधिग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. त्यात कोरोनासदृश लक्षणे असलेले ७८ नागरिक आढळून आले, तर १,०५९ ...
यावेळी ५ हजार ७०७ व्याधिग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. त्यात कोरोनासदृश लक्षणे असलेले ७८ नागरिक आढळून आले, तर १,०५९ व्याधिग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. शहरातील कोरोना हॉटस्पॉटच्या भागात १६० वैद्यकीय पथकांद्वारे सर्व्हे करण्यात आला.
संभाजीनगर, सरदार तालीम, नेताजी तरुण मंडळ, राजारामपुरी, शाहूपुरी, शाहूनगर, दुधाळी, बापट बोळ, केसापूर पेठ, कागदी गल्ली, जुना बुधवार, कसबा बावडा, लाइन बझार, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, साइक्स एक्स्टेन्शन, टाकाळा, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, रुईकर कॉलनी, सुभाषनगर, वर्षानगर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, नृसिंह कॉलनी, बोंद्रेनगर, कदमवाडी, सदरबाजार, साळी गल्ली, भोई गल्ली, न्यू पॅलेस, बुधवार पेठ, साने गुरुजी, बापूरामनगर, मार्केट यार्ड, दसरा चौक येथे हा सर्व्हे करण्यात आला.