नोकरीत पाच टक्के आरक्षणासाठी ३४०२ खेळाडू पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:54+5:302021-03-16T04:23:54+5:30
राज्य शासनाने जे खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून पहिले तीन क्रमांक किंवा सहभागी होतील त्यांना शासकीय ...
राज्य शासनाने जे खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून पहिले तीन क्रमांक किंवा सहभागी होतील त्यांना शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अनेक खेळाडूंना त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये त्याचा लाभ होत आहे, तर केंद्र शासनाच्या बँक, आयकर, जीएसटी, विविध खात्यांमध्ये खास खेळाडूंकरिता आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणेच राज्य शासनानेही खास खेळाला व खेळाडूंना प्राेत्साहन देण्यासाठी शासकीय, निमशासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत या लाभासाठी ३४०२ खेळाडू पात्र ठरले आहेत. त्यामुळे खेळाडूंनीही शासनाने मान्यता दिलेल्या ५९ खेळांमध्येच कारकीर्द घडविणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त खेळ असे,
आर्चरी, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, बास्केटबाॅल, बिलियर्डस, बाॅक्सिंग, कनोईंग, क्रिकेट, सायकलिंग, सायकलिंग, डायव्हिंग, फेन्सिंग, फिल्ड हाॅकी, फुटबाॅल, गोल्फ, जिम्नॅस्टिक (आर्टीस्टीक),जिम्नॅस्टिक (रिदम), हँडबाॅल, ज्युदो, लाॅन बाॅल्स, लाईफ सेव्हिंग, नेटबाॅल, रोईंग, रग्बी लीग, रग्बी सेव्हन्स, सेलिंग, शूटिंग, साॅफ्टबाॅल, स्क्वाॅश, जलतरण, स्क्रिनोनाईज्ड स्विमिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, तेन-पिन बाॅऊलिंग, ट्राय्थलाॅन, व्हाॅलिबाॅल(इंडोर), व्हाॅलिबाॅल (बीच), वाॅटर पोलो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बुद्धिबळ, खो-खो, मल्लखांब, आदींचा समावेश आहे. हे खेळ अपात्र
अशेते दो आखाडा, बाॅल बॅडमिंटन, बेल्ट रेसिलिंग, कॅरम, चौ-काॅन-डो, डोदगे बाॅल, ड्राॅप रोबाॅल, फिल्ड आर्चरी, फ्लोअर बाॅल, फुटबाॅल टेनिस, हुप-वन-डो, जीत-कुन-डो, किक बाॅक्सिंग, कोर्फ बाॅल, कुडो, कुराश, लगोरी, मिनी गोल्फ, पाॅवर लिफ्टिंग, रोल बाॅल, रोप स्कीपिंग, स्लिमबाम, स्केटिंग, स्पीड बाॅल, स्क्वे मार्शल आर्ट, सुपर सेव्हन क्रिकेट, टेबल साॅकर, तंग-सो-डू, टार्गेट बाॅल, टेनिक्वाॅईट, टेनिस बाॅल क्रिकेट, टेनिस क्रिकेट, टेनिस व्हाॅलिबाॅल, थाई बाॅक्सिंग, थांगता मार्शल आर्ट, थ्रो बाॅल, टग ऑफ वाॅर, युनिफाईट, वोवनाम, वुडबाॅल, योगा, युग-मुन-डो या खेळांचा समावेश आहे.