आळंदी ट्रस्टच्या नावाखाली खोट्या धनादेशाद्वारे ३५ हजाराचा ड्रायफ्रुड खरेदी, फसवणुकीचा तिघांवर गुन्हा
By तानाजी पोवार | Published: September 15, 2022 07:10 PM2022-09-15T19:10:52+5:302022-09-15T19:11:14+5:30
कोल्हापूर : आपण आळंदी ट्रस्टच्या व्यक्ती असून भविष्यात ट्रस्टसाठी मोठ्या रकमेचा ड्रायफ्रूड माल खरेदी करण्याचे अमिष दाखवून खात्यावर पैसे ...
कोल्हापूर : आपण आळंदी ट्रस्टच्या व्यक्ती असून भविष्यात ट्रस्टसाठी मोठ्या रकमेचा ड्रायफ्रूड माल खरेदी करण्याचे अमिष दाखवून खात्यावर पैसे शिल्लक नसलेल्या बॅंकेचा धनादेश देऊन ३५ हजार ५०० रुपये किंमतीचे ड्रायफूड खरेदी करुन फसवणुक केली. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृणाल महेश सदलगे (रा. भाऊसिंगजी रोड) यांचे महानगरपालिकेशेजारी ड्रायफ्रुडचे दुकान आहे. दि. २७ ऑगष्ट रोजी चारचाकी वाहनातून त्यांच्या दुकानात तीन व्यक्ती आल्या. त्यांनी आपण आळंदी ट्रस्टच्या व्यक्ती असल्याचे खोटे सांगितले.भविष्यात ट्रस्टसाठी ड्रायफ्रुडचा मोठा माल खरेदी करण्याचे त्यांनी अमिष दाखवले.
तसेच सदलगे यांचा विश्वास संपादन करुन बॅंक खात्यावर पैसे शिल्लक नसलेला धनादेश देऊन दुकानातील ३५ हजार ५०० रुपये किंमतीमध्ये २० किलो काजू, २० किलो बदाम, २ किलो अंजीर, २ किलो पिस्ता असा ड्रायफ्रूड माल खरेदी केला. पण त्यानंतर धनादेश वटला नसल्याने सदलगे यांनी बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. याबाबत कैलास फकिरा बिरारे, ठक्कर (पूर्ण नावे नाहीत) व एक अनोळखी या तिघांवर गुन्हे नोंद झाले आहेत.