वर्षभरात ३६ संस्थांचे परवाने निलंबित

By Admin | Published: May 25, 2017 01:21 AM2017-05-25T01:21:29+5:302017-05-25T01:21:29+5:30

अन्न व औषध विभागाची कारवाई : पाच लाखांच्या तडजोड शुल्काची वसुली

36 organizations suspended for the year | वर्षभरात ३६ संस्थांचे परवाने निलंबित

वर्षभरात ३६ संस्थांचे परवाने निलंबित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाच्या कोल्हापूर विभागातर्फे गेल्या वर्षभरात विविध आस्थापनांकडून अन्नाचे ३१९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यांपैकी प्रयोगशाळेने चाचणी केल्याअंती ३० नमुने मानवी सेवनास असुरक्षित असल्याचे अहवाल दिले आहेत, अशा प्रकरणी न्यायालयांत फौजदारी खटले दाखल करण्यात येत आहेत.
एकूण ७६४ अन्न आस्थापनांची तपासणी करून त्यांपैकी ११९ संस्थांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आली. दोषांची पूर्तता न केल्याने ३६ संस्थांचे परवाने निलंबित करण्यात आले. तपासणीवेळी आढळलेल्या दोषांच्या अनुषंगाने नोंदणीधारक संस्थांकडून ५ लाख २७ हजार इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. दुय्यम दर्जाच्या नमुन्याप्रकरणी नोंदणीधारक संस्थांकडून ४० हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण ६० नमुने मिथ्याछाप व दुय्यम दर्जाचे घोषित झाल्याने याप्रकरणी कारवाईसाठी न्याय निर्णय अधिकारी पुणे यांच्याकडे सुनावणीसाठी खटले दाखल करण्यात आले. याप्रकरणी न्याय निर्णय अधिकारी यांनी भेसळ केलेल्या अन्न व्यावसायिकांना ६ लाख ४४ हजार इतका दंड भरण्याचा आदेश दिले.
शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी, तंबाखू, सुगंधी सुपारी व तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांचा शोध घेऊन ३५ ठिकाणी धाडी टाकल्या. यात ४२४९. ५१५ किलो प्रतिबंधित पदार्थांचा ४४ लाख ३ हजार ५७७ रुपये इतक्या किमतीचा साठा जप्त केला. हा साठा जाळून नष्ट करण्यात आला. प्रतिबंधित पदार्थ विक्री प्रकरणी न्यायालयात १४ फौजदारी खटले दाखल केले असून अन्य प्रकरणी कारवाई चालू आहे, अशी माहिती अन्न व औैषध प्रशासनाचे कोल्हापूर ग्रामीणचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले, कोल्हापूर शहरचे मोहन केंबळकर यांनी दिली.


नागरिकांनी
तक्रार करावी
प्रतिबंधित व भेसळीचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध यापुढे अन्न व औषध प्रशासन कठोर कारवाई आहे. असे गैरप्रकार आढळून आल्यास या प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन सहायक आयुक्त चौगुले व केंबळकर यांनी केले.

Web Title: 36 organizations suspended for the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.