३६ अनधिकृत धार्मिकस्थळे हटवा

By admin | Published: April 30, 2016 12:37 AM2016-04-30T00:37:25+5:302016-04-30T00:47:33+5:30

के. पी. बक्षी यांचे निर्देश : अनधिकृत धार्मिकस्थळांबाबत तत्काळ कार्यवाही करा

36 Unapproved Residential Places | ३६ अनधिकृत धार्मिकस्थळे हटवा

३६ अनधिकृत धार्मिकस्थळे हटवा

Next

कोल्हापूर : महानगरपालिका, नगरपालिका, तसेच ग्रामीण भागातील सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिकस्थळे हटविणे, स्थलांतरीत किंवा नियमितीकरण करण्याची कार्यवाही तत्काळ करा. त्याबरोबरच सन २००९ नंतरची ३६ अनधिकृत बांधकामे हटविण्याचे काम प्राधान्याने करा, असे निर्देश गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शहर व जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिकस्थळांची बांधकामे, तसेच महापालिका आणि महसूल विभागांचे पोलिस दलांशी असलेले विषय याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक तसेच शासकीय जागांवरील अनधिकृत धार्मिकस्थळांसंबंधी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक तसेच शासकीय जागांवरील अनधिकृत धार्मिकस्थळे हटविणे, स्थलांतरित करणे किंवा नियमित करण्याबाबत क्षेत्रिय पातळीवर कार्यवाही करण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तरीय आणि महानगरपालिकास्तरीय समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्यांनी कालबद्ध कृती कार्यक्रमाद्वारे कार्यवाही करण्यावर भर द्यावा. याकामी पोलिस दलाची आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याची सूचना के. पी. बक्षी यांनी पोलिस प्रशासनास दिली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सन २००९ पूर्वीची ३१८ अनधिकृत धार्मिकस्थळांची बांधकामे होती. यापैकी (पान १० वर)

Web Title: 36 Unapproved Residential Places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.