Crime News kolhapur: चंदुरात चिमुकलीवर ३६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:29 PM2022-06-09T12:29:35+5:302022-06-09T12:31:15+5:30

चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून एका यंत्रमाग कारखान्याच्या जवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

36 year old man tortures girl in Chandur Taluka Hatkanangle District Kolhapur | Crime News kolhapur: चंदुरात चिमुकलीवर ३६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

Crime News kolhapur: चंदुरात चिमुकलीवर ३६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

Next

इचलकरंजी : चंदुर (ता हातकणंगले) येथील शाहूनगर परिसरातील ३६ वर्षीय नराधमाने सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. कपिल अशोक हत्तलगे असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, परिसरातील तरुणांनी त्याच्या घरावर हल्ला करत साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शाहूनगर गल्ली नंबर ३ मध्ये राहणारा कपिल हा विवाहित असून त्याला तीन मुली आहेत. तो परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात कामगार आहे. काल मंगळवारी दुपारी संशयिताने एका चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून एका यंत्रमाग कारखान्याच्या जवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर बुधवारी तिला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. ही माहिती समजताच परिसरातील तरुणांनी कपिलचा शोध घेतला, परंतु तोपर्यंत तो पसार झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी त्याच्या घरावर हल्ला करत साहित्याची तोडफोड केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिततावर पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: 36 year old man tortures girl in Chandur Taluka Hatkanangle District Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.