लख्ख दिव्यांनी पन्हाळा लखलखला, ३६४ वा शिव पदस्पर्श दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:36 PM2022-11-29T17:36:13+5:302022-11-29T17:38:29+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा एकमेव किल्ला मशालीच्या उजेडात पाहिला आहे. 

364th Shiva Padasparsha Day celebrated with enthusiasm at Panhalgad | लख्ख दिव्यांनी पन्हाळा लखलखला, ३६४ वा शिव पदस्पर्श दिन उत्साहात साजरा

छाया : दीपक जाधव

Next

पन्हाळा : सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र व कोल्हापुरातील शिवप्रेमींनी शिव पदस्पर्श दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. गेली १४ वर्ष प्रतीकात्मक शिव पदस्पर्श दिन सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र साजरा करत आहे. तीन दरवाजा याठिकाणी पणत्या लावून व इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या संकल्पनेतून या दिवसाचे महत्त्व सांगितले.   
 
१० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा वध झाल्यानंतर अवघ्या १८ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा मिरज कोल्हापूर सह किल्ले पन्हाळगड दिनांक २८ नोव्हेंबर १६५९ रोजी ताब्यात घेतला. त्याच दिवशी शिवाजी महाराज सांजवेळी पन्हाळा पाहण्यासाठी पोहोचले. त्यावेळी महाराजांनी हा एकमेव किल्ला मशालीच्या उजेडात पाहिला आहे. 
 
या दिनाचे औचित्य साधून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या संकल्पनेतून सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र आणि कोल्हापुरातील शिवप्रेमी गेली १४ वर्ष प्रतीकात्मक शिव पदस्पर्श दिन साजरा करत आहेत. शिवस्पर्श दिन यशस्वी करण्यासाठी अमित आडसुळे, हर्षल सुर्वे, ओंकार कोळेकर, दिग्विजय भोसले, रवी कदम, इंद्रजीत माने, सुशांत हराळे, कुंभोज कुंभोजकर आणि शिवप्रेमी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: 364th Shiva Padasparsha Day celebrated with enthusiasm at Panhalgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.