काळम्मावाडी धरणात ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:24 AM2021-05-01T04:24:18+5:302021-05-01T04:24:18+5:30

जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के (२५.४०) टीएमसीने भरले होते. आज धरणाचा पाणीसाठा ३७.०४ टक्के ...

37% water available in Kalammawadi dam | काळम्मावाडी धरणात ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध

काळम्मावाडी धरणात ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध

googlenewsNext

जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के (२५.४०) टीएमसीने भरले होते. आज धरणाचा पाणीसाठा ३७.०४ टक्के म्हणजे ९.४० टी.एम.सी. इतका उपलब्ध आहे. गतवर्षी पाणीसाठा ४३.३८ टक्के म्हणजे ११.०२ टी.एम.सी. इतका पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा कमी असला तरी परिणामी दूधगंगा नदीकाठावरील गावांना पाणी समस्या भासणार नसल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मुबलक पाऊस होणार असे वर्तविले असले तरी पाण्याचे नियोजन काटेकोरपणे व्हावे, अशी मागणी या पाण्यावर अवलंबून शेतकरी करीत आहेत. शनिवारपासून धरणातून दूधगंगा नदीपात्रात २५० क्युसेक , उजवा कालवा २५० क्युसेक, तर गैबी ५०० क्युसेक असे एकूण १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे.

पाऊस सुरू होण्यासाठी अजून विलंब असल्याने वेळापत्रकानुसार उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे

फोटो कॅप्शन.... एप्रिलअखेर काळम्मावाडी धरणात उपलब्ध असणारा ३७.०४ टक्के पाणीसाठा .

छाया ....... निवास पाटील (संग्रहित )

Web Title: 37% water available in Kalammawadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.