जिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:32 AM2021-01-16T11:32:38+5:302021-01-16T11:39:49+5:30
zp Kolhapur- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्यामुळे केवळ दहा दिवसांत खरेदी प्रक्रिया करून जिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते २२ जानेवारीला त्या लोकार्पित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.
कोल्हापूर -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्यामुळे केवळ दहा दिवसांत खरेदी प्रक्रिया करून जिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते २२ जानेवारीला त्या लोकार्पित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.
मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचा होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. शुक्रवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पवार यांच्याहस्ते सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाईल. चौथ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यानंतर पोलीस मैदानावर ३७ रुग्णवाहिका आणि दोन व्हॅक्सिन व्हॅनचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेत शांतता
ग्रामपंचायतींसाठी मतदान असल्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेत शांतता होती. अपवाद वगळता एकही जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेकडे फिरकले नाहीत. आता सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्यामुळे सर्वजण त्याचदिवशी येणार आहेत.