खासगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ३८ टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:26+5:302021-09-27T04:25:26+5:30
संस्थापक भरत रसाळे, ज्येष्ठ संचालक आनंदा हिरुगडे व शिवाजी भोसले आणि सर्व संचालक-सल्लागार मंडळ यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषद ...
संस्थापक भरत रसाळे, ज्येष्ठ संचालक आनंदा हिरुगडे व शिवाजी भोसले आणि सर्व संचालक-सल्लागार मंडळ यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी येथे ऑनलाइन पद्धतीने झाली. प्रास्ताविक अहवाल सालातील चेअरमन माननीय शिवाजी भोसले सर यांनी करून अहवालातून सालात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चेअरमन महादेव डावरे म्हणाले, संस्थेस चालू वर्षी विक्रमी एक कोटी ३६ लाखांवर नफा झाला असून, संस्थेच्या एकूण कर्ज मर्यादेत वाढ करून ती ४५ लाख केली आहे, तसेच नफ्यातून चालू अहवाल सालात सभासदांना १५ टक्के डिव्हिडंड व सभासद भेट २३ टक्के असा एकूण ३८ टक्के डिव्हिडंट देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.
कामकाजात संतोष आयरे, राजेंद्र कोरे, परशराम घाटगे, टी.आर. पाटील, दशरथ कांबळे, लालासाहेब पाटील, एस.डी. कासार, अशोक कांबळे, अनिल खोत इत्यादी सभासदांनी भाग घेतला.
भरत रसाळे, ज्येष्ठ संचालक आनंदा हिरुगडे, अहवाल सालातील चेअरमन शिवाजी भोसले माजी चेअरमन राजेश कोंडेकर, राजाराम हुल्ले, कुमार पाटील, विकास कांबळे, चंद्रकांत पाटील, सूर्यकांत बरगे, छाया हिरुगडे सल्लागार समिती सदस्य आनंदा डावरे, यशवंत कोळी, मच्छिंद्र नाळे, अरुण गोते उपस्थित होते.
फोटो ओळी : खासगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना चेअरमन महादेव डावरे संस्थापक भरत रसाळे उपस्थित होते.