जिल्ह्यातील ३८ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:51 PM2020-08-07T14:51:58+5:302020-08-07T15:00:28+5:30

पावसामुळे जिल्ह्यातील १० राज्यमार्ग व २८ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ३८ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

38 roads closed in the district; Alternative route resumes | जिल्ह्यातील ३८ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

जिल्ह्यातील ३८ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ३८ मार्ग बंदपर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर : पावसामुळे जिल्ह्यातील १० राज्यमार्ग व २८ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ३८ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील रामा-194 वरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 3 फूट पाणी तसेच चिखली ते राष्ट्रीय महामार्गादरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक बंद आहे.

चंदगड तालुक्यातील रा.मा. क्र. 189 मार्गावरील चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक बंद. चंदगड गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने शिरगाव हेरे मार्गे व शिरगाव हिंडगाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू. तसेच गडहिंग्लजमधील भडगाव पुलावर 1.6 फूट पाणी आल्याने गडहिंग्लज, आजरा नेसरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू. भुदरगडमधील रस्त्यावर पाणी आल्याने परिते शेवाळे मार्गे तसेच कुर पुलाजवळ पाणी आल्याने कुर कोनवडे म्हसवे गारगोटी मार्गे वाहतुक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील रा.मा.क्र. 201 मार्गावरील इब्राहिमपूर पुलावर 3 फूट पाणी आल्याने कनूर गवसे इब्राहिमपूर अडकूर प्रजिमा क्र. 66 ते रा.मा. क्र. 189 प्रजिमा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू. तसेच गडहिंग्लजमधील उंबरवाडी कॉजवेवर पाणी आल्याने सुळे महागाव मार्गे पर्यायी वाहतुक सुरू.

गगनबावडा तालुक्यातील राज्य मार्ग क्र. 177 मार्गावरील मांडुकली गावाजवळील ओढ्यावर 2 फूट पाणी, कोदे फाट्याजवळ 2 फूट पाणी व दानेवाडी जवळ 1 फूट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद. तसेच हातकणंगलेमधील ऐतवडे गावाजवळ पुलावर पाणी आल्याने एकेरी वाहतुक सुरू. रांगोळी ते इचलकरंजी रस्त्यावर 2.6 फूट पाणी आल्याने जंगमवाडी, बोरगाव, इचलकरंजी मार्गे वाहतुक वळवण्यात आली आहे.

चंदगड तालुक्यातील रा.मा.क्र. 180 मार्गावरील दाटे गावाजवळ रस्त्यावर व कानूर खुर्द पुलावर पाणी आल्याने आमरोली सोनारवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

हातकंणगले तालुक्यातील रा.मा.क्र. 192 मार्गावर इचलकरंजी जुन्या पुलावरून वाहतुक बंद असल्याने इचलकरंजी नव्या पुलावरून वाहतुक सुरू आहे.

शिरोळ तालुक्यातील रा.मा.क्र. 200 मार्गावरील शिरढोण पुलावर 3 फुट पाणी आल्याने नांदणी, जयसिंगपूरमार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

राधानगरी तालुक्यातील रा.मा.क्र. 178 मार्गावरील निढोरी पुलावर पाणी आल्याने यमगे निपाणी मार्गे पर्यायी वाहतुक सुरू. तसेच शिंदेवाडी गावाजवळ पाणी आल्याने शिंदेवाडी ते मुरगूड यांना पर्यायी मार्ग नाही. निढोरी ते मुदाळ मार्गे रस्ता सुरू.

करवीर तालुक्यातील रा.मा.क्र. 193 मार्गावर चिखली गावच्या कमानीजवळ रस्त्यावर पाणी आल्याने तसेच प्रयाग पुल ते वडणगे रस्त्यावर पाणी आल्याने वडणगे पाडळी, यवलुज, खुपीरे मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

हातकणंगले तालुक्यातील रा.मा. क्र. 153 मिळणारा राज्यमार्ग क्र. 195 मार्गावर मानकापूर इचलकरंजी दरम्यान पाणी आल्याने मानकापूर शिवनाकवाडी मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

आजरा तालुक्यातील प्रजिमा क्र. 58 मार्गावर साळगाव बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने ओडीआर 139 सोहाळे, बाची मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

करवीर तालुक्यातील प्रजिमा क्र. 37 मार्गावरील बाचणी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने कसबा बीड घानवडे प्रजिमा 29 मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

चंदगड तालुक्यातील प्रजिमा क्रं. 71 मार्गावरील करंजगाव पुलावर 2 फुट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील प्रजिमा 86 मार्गावरील किमी -0/750 वरील निलजी बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने प्रजिमा 80 वरुन दुंडगे- जरळी- मुगळी- नुल मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

राधानगरी तालुक्यातील प्रजिमा क्रं. 35 मार्गावरील शिरगाव बंधाऱ्यावर 5 फूट पाणी असल्याने तारळे व राशीवडे मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

पन्हाळा तालुक्यातील प्रजिमा क्रं. 39 मार्गावरील गोठे पुलावर 2 फुट पाणी आल्याने मल्हार पेठे, सुळे, कोदवडे प्रजिमा 26 मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

गगनबावडा तालुक्यातील प्रजिमा क्रं. 34 मार्गावरील अंदूर बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्याने अणदूर, मणदूर, वेतवडे, बालेवाडी प्रजिमा क्रं. 25 मार्गे वाहतूक सुरु आहे.

गगनबावडा तालुक्यातील प्रजिमा क्र. 19 मार्गावरील मनवाडा बंधाऱ्यावर 2 फूट पाणी व रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर चिखली पाडळी येवलुज बाजारभोगाव मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.

चंदगड तालुक्यातील प्रजिमा क्र. 65 मार्गावरील मोरीवर 2 फूट पाणी आल्याने प्रजिमा 65 ते ढोलगरवाडी, गौळवाडी ग्रा.मा. 34 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू असून  तळगुली सीडीवर्कवर 1 फूट, कूदनुर पुलावर 2 फूट, ढोलगरवाडी सीडीवर्कवर 1.6 फूट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक बंद आहे.

करवीर तालुक्यातील प्रजिमा 29 मार्गावरील शिरोली गावाजवळ मोरीवर पाणी शिरोली दुमाला, घानवडे हसुर दुमाला, सोनाळी ते चाफोडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू असून तसेच महे पुलावर 4 फुट पाणी,15/300 येथे रस्त्यावर पाणी आल्याने महे गावापर्यंची वाहतूक बालिंगा पाडळी व कसबा बीड करीता कुडीत्रे फॅक्टरी सांगरुळ मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील प्रजिमा क्र. 18 मार्गावरील माजगाव पुलावर 2 फुट पाणी असल्याने कळे पुनाळ दिगवडे प्रजिमा क्र. 17 मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील प्रजिमा क्र. 67 मार्गावरील म्हाळेवाडी गावाजवळ तसेच निट्टुर गावाजवळ मोरीवर पाणी असल्याने कोवाड, ढोलकरवाडी, गौळवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू, माणगाव केटीवीयर 1 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद आहे.

शाहूवाडी तालुक्यातील प्रजिमा क्र. 6 मार्गावरील डोणोली गावाजवळ बंधाऱ्यावर पाणी असल्याने थेरगाव, सातर्डे सातवे शिंदेवाडी व थेरगाव सावर्डे, सातवे मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

कागल तालुक्यातील प्रजिमा क्र. 46 मार्गावरील बस्तवडे बंधाऱ्यावर 3 फुट पाणी असल्याने इजिमा क्र. 189 अनुर ते बानगे व इजिमा क्र. 93 बानगे मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील प्रजिमा क्र. 76 मार्गावरील पाटणे पुलावर 2 फुट पाणी असल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे.

करवीर तालुक्यातील प्रजिमा क्र. 28 मार्गावरील कोगे बंधाऱ्यावर 3 फुट पाणी असल्याने कुडीत्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे पर्यायी वाहतूक सुरू. तसेच लहान पुलावर 3 फूट पाणी आल्याने कोल्हापूर, परिते मार्गे व बालिंगा, पाडळी, महे मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

शाहूवाडी तालुक्यातील प्रजिमा क्रं. 4 मार्गावरील शिरगांव मठ ते सवतेमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने मलकापूर सावे बांबवडे सुरुड मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

कागल तालुक्यातील प्रजिमा क्रं. 50 मार्गावरील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर बोळावी ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगड मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील प्रजिमा 80 मार्गावरील जरळी बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्याने गडहिंग्लज, आजरा, नेसरी, महागाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील प्रजिमा 57 मार्गावरील हलकर्णी कॉजवेवर 9 इंच पाणी असल्याने बसरगे येणेचवंडी, नंदनवाड, हलकर्णी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

करवीर तालुक्यातील प्रजिमा क्र. 28 मार्गावरील शेळकेवाडी गावाजवळ पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील प्रजिमा क्र. 64 मार्गावरील कानडेवाडी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने नेसरी, अडकूर मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

हातकणंगले तालुक्यातील प्रजिमा क्र. 96 मार्गावरील निलेवाडी पुलावर 2 फूट पाणी आल्याने वारणानगर चिकुर्डे मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील प्रजिमा क्र. 11 मार्गावर केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने रस्ता बंद असून गायमुख वळण रस्त्यावरून पर्यायी वाहतुक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील प्रजिमा क्र. 17 मार्गावरील कुशिरे, दिघवडे, माळवाडी रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने रामा. क्र. 193 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील प्रजिमा क्र. 61 मार्गावरील कोवाड गावाजवळ रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे.

चंदगड तालुक्यातील प्रजिमा क्र. 66 मार्गावरील काणूर व गवसेगावाजवळ रस्त्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे.

कागल तालुक्यातील प्रजिमा क्र. 42 मार्गावरील कुरुकली पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद. कुरुकली करिता कोल्हापूर कुरुकली व हासुर करिता हळदी सडोली खालसा मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.

Web Title: 38 roads closed in the district; Alternative route resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.