माॅर्निंग वाॅक करणाऱ्या ३८० जणांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:20+5:302021-05-20T04:27:20+5:30

कोल्हापूर : कोविड-१९ संसर्गाच्या ब्रेक द चेनची अंमलबजावणी म्हणून जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. दिवसभरात माॅर्निंग वाॅक करणारे, ...

380 morning walkers beaten by police | माॅर्निंग वाॅक करणाऱ्या ३८० जणांना पोलिसांचा दणका

माॅर्निंग वाॅक करणाऱ्या ३८० जणांना पोलिसांचा दणका

Next

कोल्हापूर : कोविड-१९ संसर्गाच्या ब्रेक द चेनची अंमलबजावणी म्हणून जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. दिवसभरात माॅर्निंग वाॅक करणारे, विनाकारण वाहन फिरविणारे व मोटार वाहन कायद्यानुसार आणि मास्क न घालणारे अशा विविध कारणावरून पोलिसांनी बुधवारी दिवसभरात पावणेसहा लाखाचा दंड वसूल केला. यासोबतच १३२ वाहने जप्त केली.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी कंबर कसली आहे. दिवस-रात्र बंदोबस्त आणि रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना अटकाव करणे आदी कामे पोलीस करीत आहेत. याच कारवाईचा एक भाग म्हणून जिल्ह्यात दिवसभरात १३०८ जणांकडून विनाकारण वाहन फिरविल्याबद्दल २ लाख ७२ हजाराचा दंड वसूल केला. तर सकाळी माॅर्निंग वाॅकर म्हणून फिरणाऱ्या ३८० जणांवर गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून १ लाख ५६ हजार ८०० रुपयाचाही दंड वसूल केला. यासोबतच मास्क न घातलेल्या ४३९ नागरिकांवर कारवाई करीत १ लाख १७ हजार ६०० रुपये व २४ आस्थापनांवर कारवाई करीत ३० हजार ६६० आणि १३२ वाहने जप्त केली. या सर्वातून ५ लाख ७७ हजार ५०० इतका महसूल दिवसभरात सरकारी तिजोरीत जमा झाला. यापुढेही ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.

Web Title: 380 morning walkers beaten by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.