जिल्हा पोलीस दलातील ३८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:22 AM2021-05-15T04:22:58+5:302021-05-15T04:22:58+5:30
कोल्हापूर : कोराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय ...
कोल्हापूर : कोराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दलातील एकूण ३८५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलात तीन पोलीस अधिकारी, २२ पोलीस उपनिरीक्षक आणि ३५० पोलीस कर्मचारी असा ३८५ कर्मचाऱ्यांची एप्रिलअखेर दोन वर्षे, तर कुणाची तीन वर्षे एकाच पोलीस ठाण्यात पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हे कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत. त्यांची बदली एप्रिल महिन्यात होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना राज्याच्या गृहविभागाने दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे या ३८५ कर्मचारी, अधिकारी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
चौकट
पोलीस दलातील ३५ कर्मचारी व ३ अधिकारी कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर विशेष पोलीस कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.