अलमट्टीतून ३८९२२ क्युसेक विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:13 AM2020-09-30T11:13:22+5:302020-09-30T11:13:37+5:30
कोल्हापूर : राधानगरी धरणात २३१.६७ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार कोयनेतून १०५० तर अलमट्टी ...
कोल्हापूर : राधानगरी धरणात २३१.६७ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार कोयनेतून १०५० तर अलमट्टी धरणातून ३८९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात १०५.१५ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १२३.०८१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.56 दलघमी, पाटगाव 104.63 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा 43.373 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम 13.6, सुर्वे 15.8 फूट, रुई 42 फूट, इचलकरंजी 38 फूट, तेरवाड 37.6 फूट, शिरोळ 30.6 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 16.6 फूट तर नजीकच्या सांगली 8.6 फूट व अंकली 8.10 फूट अशी आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण मार्गे वाहतूक सुरू आहे.