वारणा दूध संघासाठी ३९ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:46 AM2021-02-06T04:46:24+5:302021-02-06T04:46:24+5:30
वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ...
वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ३९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले यांनी दिली
तात्यासाहेब कोरेनगर येथील महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांचे उत्पादक सभासद असलेल्या मल्टिस्टेट संस्थेच्या निवडणुकीसाठी १ फेबुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत ‘अ’ वर्ग उत्पादक सभासद गटातून १३ जागांसाठी २२ अर्ज दाखल झाले आहे. ‘ब’ वर्ग संस्था सभासद गटातून २ जागेसाठी ७ अर्ज, महिला प्रतिनिधी गटाच्या २ जागेसाठी ३ अर्ज, अनुसूचित जाती -जमातीच्या २ जागेसाठी ४ अर्ज, आणि ‘क’ वर्ग ग्राहक गटांतून २ जागेसाठी ३ अर्ज असे एकूण ३९ जणांचे अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चौगले यांनी सांगितले.
सोमवारी (दि. ८) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून ११ फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास १५ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता बोलाविलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी नियमानुसार बिनविरोध सदस्याची नावे जाहीर करतील. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नामदेव दवडते, शिवाजी यादव काम पाहत आहेत.