Earthquake In Kolhapur : कोल्हापूरला भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:10 AM2021-09-05T11:10:28+5:302021-09-05T11:10:59+5:30
भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीखाली तब्बल ३८ किलो मीटरवर होता. तसेच भूकंपाची तीव्रता अथवा धक्का सौम्य असल्याने यात कुठलीही हाणी झाली नाही.
कोल्हापूरःकोल्हापूर आणि परिसरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कळे ते पूनाळदरम्यान होता. या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Earthquake in Kolhapur area)
यासंदर्भात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ म्हणाले, "कोल्हापूर पासून सुमारे 18 किलोमीटरवर असणाऱ्या कळे ते पूनाळदरम्यानच्या शेतात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. मात्र त्याची तीव्रता कमी असल्याने कसल्याही प्रकारची हानी झालेली नाही.
भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीखाली तब्बल ३८ किलो मीटरवर होता. याशिवाय भुमापन केंद्र वारणा, तसेच कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाल्याचे समजते.
Earthquake of Magnitude:3.9, Occurred on 04-09-2021, 23:49:28 IST, Lat: 16.74 & Long: 74.06, Depth: 38 Km ,Location: 19km W of Kolhapur, Maharashtra, India for more information download the BhooKamp App https://t.co/jionhekMtJpic.twitter.com/Z3ly2RXhyM
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) September 4, 2021
मोठी बातमी! सोलापुरात भूकंपामुळे मोठी घबराट; लोक पडले घराबाहेर
सोलापूरमध्येही भूकंपाचे धक्के -
कोल्हापूर परिसराशिवाय सोलापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जाते. सोलापूर शहराला शनिवारी रात्री ११.४७ ते १२ वाजण्याच्या सुमारास, भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आले. या वृत्ताला अधिकृत भूकंपमापन यंत्रणेचा मात्र कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, शहरातील नागरीक गूढ आवाज आणि इमारतीला कंपन जाणवल्याने घराबाहेर पडले होते.