घोडावत विद्यापीठात ३९० बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:03+5:302021-05-07T04:27:03+5:30
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शासनाच्या वतीने घोडावत विद्यापीठामध्ये सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू केले ...
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शासनाच्या वतीने घोडावत विद्यापीठामध्ये सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू केले होते. गेल्या वर्षी २३ हजार रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार झाले. कोरोनाचा वाढता प्रभाव आणि वाढत चाललेली रुग्णसंख्या यामुळे पुन्हा घोडावत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. ३९० बेडची क्षमता असून यामध्ये ९० बेड हे ऑक्सिजनचे आहेत. ऑक्सिजन टॅंकची उभारणी गतवर्षी झाली आहे. सध्या डॉक्टर, परिचारिका, आवश्यक तो कर्मचारी स्टाफ भरून घेण्यासाठी शासनाच्या वतीने नेमणूक आदेश देण्यात आले आहेत. मात्र कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका हजर झालेल्या नाहीत. तसेच ५० बेडसाठी सध्या ऑक्सिजन सेटअप लावण्याचे काम सुरू झाले आहे. या कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नाही. तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, अशांनाच दाखल करून घेतले जाणार असल्याचे डॉ. उत्तम मदने यांनी स्पष्ट केले.