कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:10 PM2022-09-15T12:10:16+5:302022-09-15T12:27:48+5:30

पक्ष पंधरवडा, गुरूवार असल्याने व दिवसभर दक्षिणद्वार सोहळा राहिल्याने मंदिरात स्नानासाठी गर्दी झाली. मंदिर प्रशासनाने याची दक्षता घेऊन सुरक्षा वाढविली आहे.

3rd Dakshindwar Ceremony completed in Nrisimhwadi Datta Temple | कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची गर्दी

कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची गर्दी

googlenewsNext

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा आज, गुरुवारी संपन्न झाला. गुरुवार असलेने भाविकांनी दक्षिण द्वार सोहळ्यास मोठी गर्दी केली होती.

सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ४ फुटाने वाढ झाली. यामुळे नदीची पाणी दत्त मंदिरात शिरले.

दत्त मंदिरात पाणी आलेने आज पहाटे ५ वाजता चालू सालातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. पक्ष पंधरवडा, गुरूवार असल्याने व दिवसभर दक्षिणद्वार सोहळा राहीलेने मंदिरात स्नानासाठी गर्दी झाली. मंदिर प्रशासनाने याची दक्षता घेऊन सुरक्षा वाढविली आहे.

दरम्यान मंदिर परिसरातील सर्व साहित्य कर्मचारी व सेवेकरी वर्गाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे व सचिव संजय नारायण पुजारी यांनी दिली. मुख्य मंदिरात नदीचे पाणी असलेने श्रीं ची उत्सवमूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी महाराज  मंदिरात ठेवणेत आली आहे व तेथे नित्योपचार पूजा चालू आहे. नृसिंहवाडी व औरवाड गावाला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

Web Title: 3rd Dakshindwar Ceremony completed in Nrisimhwadi Datta Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.