सुटे भाग नसल्यामुळे केएमटी बसेस धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:29 AM2019-11-25T11:29:26+5:302019-11-25T11:32:55+5:30

कोल्हापूर महापालिका परिवहनचे (केएमटी) अडथळे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. दररोज तीन ते चार लाखांचा तोटा होत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी केएमटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

4 buses in the dust due to no spare parts | सुटे भाग नसल्यामुळे केएमटी बसेस धुळखात

सुटे भाग नसल्यामुळे केएमटी बसेस धुळखात

Next
ठळक मुद्देकेएमटी वर्कशॉपच्या बजेटला कात्री लावल्याचा फटका : बस बंदमुळे तोट्यात भर

विनोद सावंत
कोल्हापूर : सुटे भाग नसल्यामुळे केएमटीच्या दररोज किमान १२ बसेस वर्कशॉपमध्ये धूळ खात पडत आहेत. वर्कशॉपसाठी अपेक्षित बजेट मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तोटा कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर बंद बसेसची संख्या वाढण्याचा धोका आहे.

कोल्हापूर महापालिका परिवहनचे (केएमटी) अडथळे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. दररोज तीन ते चार लाखांचा तोटा होत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी केएमटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित यश येत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, महाभाई भत्ता, विविध कंपनींची देणी असे १९ कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. या सर्वांचा परिणाम केएमटी वर्कशॉपच्या कामकाजावर होत आहे.

एकीकडे केएमटीची आर्थिक स्थिती सुधारण्याचे आव्हान असताना दुसरीकडे बसेस नादुरुस्ती ही डोकेदुखी झाली आहे. वर्कशॉपला दर महिन्याला २५ लाखांची गरज असताना केवळ १५ लाख रुपयेच मिळत आहेत. येथील कामकाजावर याचा परिणाम होत आहे. एक बस दररोज २५ हजार किलोमीटरचा प्रवास करते. त्यामुळे बसेस खराब होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सुटे भाग विक्री करणाºया कंपनी आगाऊ बिल दिल्याशिवाय सुटे भाग देत नाहीत. त्यामुळे दररोज १२ बसेस वर्कशॉपमध्ये बंद राहत आहेत. दुरुस्तीसाठी आलेल्या एका बसचे सुटे भाग दुसºया बसला घालण्याचा प्रकार वर्कशॉपमध्ये सुरू आहे. बस बंद राहत असल्यामुळे काही मार्गावरील बससेवा बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर येत आहे. याचा फटका एकूण उत्पन्नावर होत आहे. केएमटीची सेवा ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर सुरू आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून राज्य शासनाने तसेच महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

केएमटीची सद्य:स्थिती

  • एकूण बसेस - १२९
  • नवीन बस अशोक लेलँड - ७५
  • जुन्या बसेस टाटा - ५४
  • सुस्थितीतील बसेस - ९५ ते १००
  • सुटे भाग नसल्यामुळे बंद असणाºया बसेस - १२
  • एक बसचा दररोजचा प्रवास - २५ हजार किलोमीटर
  • कार्यक्षेत्र - शहर व शहरालगत २० किलोमीटर

-वर्कशॉपसाठी महिन्याला आवश्यक बजेट - २५ लाख
-प्रशासनाकडून मिळणारे बजेट - १५ लाख
---------------------------------
केएमटीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता प्राधान्यानुसार खर्च केला जातो. यामध्ये डिझेल खरेदीला प्रथम प्राधान्य दिले जाते. यानंतर टायर, सुट्या भागांची खरेदी केली जाते. वाहक नसल्यामुळेही बसेस बंद ठेवाव्या लागतात. या सर्वांचा विचार करून दररोजचे १०२ बसेसचेच शेड्यूल केले जाणार आहे.
- संजय भोसले, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक
--------------------------------------
नवीन बसचा खुळखुळा
केएमटीकडे २००५ मध्ये ३९, तर २००९ मध्ये १५ बसेस खरेदी केल्या आहेत,, तर २०१५ मध्ये केंद्र शासनाकडून ७५ बसेस मिळाल्या आहेत. यामध्ये बहुतेक जुन्या बसेस सुस्थितीमध्ये आहेत, तर नवीन बसेस जादा खराब होत आहेत. सध्या यामधील आठ बसेस सुटे भाग मिळाले नसल्यामुळे वर्कशॉपमध्ये धूळ खात आहेत. जुन्यामधील चार बसेस बंद आहेत.
-----------------------------------

 

Web Title: 4 buses in the dust due to no spare parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.