‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 02:11 PM2020-01-02T14:11:26+5:302020-01-02T14:27:05+5:30
‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे निदर्शनास आले.
कोल्हापूर : ‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे निदर्शनास आले.
शहरातील दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, सायबर चौक, हॉकी स्टेडियम, लक्षतीर्थ वसाहत, कावळा नाका, क्रशर चौक यासह चौका-चौकांत नाकाबंदी करून, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.
झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, आदी वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. कारवाईमध्ये शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रेरणा कट्टे यांच्यासह पाच निरीक्षक व ३०० कर्मचारी सहभागी झाले होते.