शिरोळमधील कोविड सेंटरसाठी ४ लाख २३ हजार मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:02+5:302021-06-09T04:32:02+5:30

शिरोळ : शहरात लहान मुलांचे मोफत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरसाठी नगरपालिकेने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे ...

4 lakh 23 thousand sanctioned for Kovid Center in Shirol | शिरोळमधील कोविड सेंटरसाठी ४ लाख २३ हजार मंजूर

शिरोळमधील कोविड सेंटरसाठी ४ लाख २३ हजार मंजूर

Next

शिरोळ : शहरात लहान मुलांचे मोफत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरसाठी नगरपालिकेने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. यामुळे या सेंटरसाठी चार लाख २३ हजार रुपये मंजूर झाले आहेत. नगरपालिकेच्या पाठपुराव्यामुळे या सेंटरसाठी ही मदत मोठी आधारवड ठरली आहे.

शिरोळ येथे अर्जुनवाड मार्गावर लहान मुलांचे मोफत कोविड सेंटर सोमवारी (दि. ७) सुरू करण्यात आले. लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास सर्वसामान्यांना या सेंटरचा उपयोग होणार आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे. नगरपालिकेच्या वतीने या सेंटरसाठी मदत म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावामुळे चार लाख २३ हजार रुपये सेंटरसाठी मंजूर झाले आहेत. पालिकेने दाखविलेल्या या तत्परतेमुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

यासाठी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, प्रकाश गावडे, योगेश पुजारी, शरद मोरे, कुमुदिनी कांबळे, कमलाताई शिंदे, करुणा कांबळे, सुरेखा पुजारी, जयश्री धर्माधिकारी, तातोबा पाटील, मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी यांनी प्रयत्न केले.

Web Title: 4 lakh 23 thousand sanctioned for Kovid Center in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.