शहरात ४० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:53+5:302021-04-17T04:23:53+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरात आतापर्यंत ९२ हजार ३२ नागरिकांचे पहिल्या डोसचे, तर १० हजार ८९४ दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण ...
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरात आतापर्यंत ९२ हजार ३२ नागरिकांचे पहिल्या डोसचे, तर १० हजार ८९४ दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले. ४५ वर्षांवरील ४० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरात लसीकरण मोहीम दि. १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. महापालिकेस शासनाकडून आतापर्यंत ९० हजार २०० इतक्या डोसचा पुरवठा झाला होता. काही डोस जिल्हा परिषदेकडून मिळाले. आतापर्यंत ९२,०३२ इतक्या लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे तर १०,८९४ इतक्या लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
शुक्रवारी केवळ अडीच हजार डोस मिळाले. त्यामुळे दुपारपंतर तीन ठिकाणी लसीकरण करण्यात आले. दिवसभरात १४६२ व्यक्तींचे लसीकरण झाले. सध्या उपलब्ध लस साठा पाहता आज, शनिवारी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई व मोरे माने नगर या केंद्रात कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस व सावित्रीबाई फुले, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, आयसोलेशन येथे कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोसचे लसीकरण चालू राहणार आहे.