आजरा नगर पंचायतीचे ४० कर्मचारी समायोजनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:14+5:302021-06-25T04:18:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : आजरा नगर पंचायतीच्या ४० कर्मचाऱ्यांचे अद्यापही नगरविकास विभागाकडे समायोजन झालेले नाही. सफाई व पाणीपुरवठा ...

40 employees of Ajra Nagar Panchayat awaiting adjustment | आजरा नगर पंचायतीचे ४० कर्मचारी समायोजनाच्या प्रतीक्षेत

आजरा नगर पंचायतीचे ४० कर्मचारी समायोजनाच्या प्रतीक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आजरा : आजरा नगर पंचायतीच्या ४० कर्मचाऱ्यांचे अद्यापही नगरविकास विभागाकडे समायोजन झालेले नाही. सफाई व पाणीपुरवठा विभागातील या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. वाढीव आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन न झाल्यास नगर पंचायतीला भविष्यकाळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

आजरा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर होऊन ३ वर्षे ९ महिने झाले आहेत. ग्रामपंचायतीकडील ५३ कर्मचाऱ्यांपैकी फक्त १३ कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीकडे समायोजन झाले आहे. ४० कर्मचारी अद्यापही समायोजनाच्या प्रतीक्षेत आहेत. लिपीक ५, सफाई कर्मचारी २१, पाणीपुरवठा कर्मचारी १४ असे ४० कर्मचारी आहेत. २०११च्या लोकसंख्येनुसार वाढीव आकृतीबंध मंजूर होऊन त्यानुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन करा, अशी कर्मचारी संघटनेची मागणी आहे. मात्र, नगरविकास विभागाकडून अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही.

समायोजनाच्या प्रतीक्षेत असलेले आजरा नगर पंचायतीकडील सफाई व पाणीपुरवठा कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे नगरविकास विभागाकडे समायोजन होणे गरजेचे आहे. शहराची स्वच्छता व पाणीपुरवठा ज्यांच्या हातात आहे, असेच कर्मचारी समायोजनापासून वंचित व तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. भविष्यकाळात या कर्मचाऱ्यांनी अचानक काम थांबवल्यास नगर पंचायतीचे प्रशासन कोलमडण्याची शक्यता आहे.

चौकट :

नगर पंचायतीकडे शासनाचे अधिकारीच नाहीत

आजरा नगर पंचायत सुरु होऊन ३ वर्षे ९ महिन्यांचा कालखंड झाला आहे. तरीही आकृतीबंधानुसार बांधकाम, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रशासकीय, नगररचना या विभागाचे अधिकारीच नाहीत. मुख्याधिकारी, लेखापाल व कर निरीक्षकच आजरा नगर पंचायतीचा कारभार कर्मचाऱ्यांना घेऊन सांभाळत आहेत.

Web Title: 40 employees of Ajra Nagar Panchayat awaiting adjustment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.