शिक्षक बँकेच्या पगारदार खातेदारांना ४० लाख अपघाती विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:03+5:302021-04-20T04:24:03+5:30
(फाेटो-१९०४२०२१-कोल-प्रशांतकुमार पोतदार) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील पगारदार खातेदारांना ४० लाखांचे अपघाती विमा संरक्षण योजना ...
(फाेटो-१९०४२०२१-कोल-प्रशांतकुमार पोतदार)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील पगारदार खातेदारांना ४० लाखांचे अपघाती विमा संरक्षण योजना सुरू केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी दिली. बँकेत पगार जमा होणाऱ्या सुमारे एक हजार शिक्षकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांकडून त्यांच्या खातेदारांसाठी विविध योजना सुरू आहेत. शिक्षक बँकेच्या खातेदारांना या योजनांचा फायदा व्हावा, यासाठी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बँकेकडील पगारदार खातेदारांना ३० लाख अपघाती विमा संरक्षण देण्याबाबत विचार असल्याचे सांगितले होते. सभासदांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या धर्तीवर पगारदार खातेदारांना ३९० रुपयांच्या हप्त्यात ४० लाखांचा अपघाती विमा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. याबाबत न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीशी करार केला आहे. या योजनेचा एक हजार शिक्षकांना फायदा होणार असून उर्वरित शिक्षकांनी बँकेकडे पगार जमा करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक नामदेव रेपे, जी. एस. पाटील, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, शिवाजी पाटील, साहेब शेख, दिलीप पाटील, अण्णासाहेब शिरगावे, प्रसाद पाटील, डी. जी. पाटील, बाजीराव कांबळे, सुरेश कोळी, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील, संदीप पाटील, सुमन पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, विमा कंपनीचे श्रीकांत कोले, आनंद कुलकर्णी उपस्थित होते.