जिल्ह्यासाठी ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व २५ बायपॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:08+5:302021-06-03T04:18:08+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, याला पर्याय म्हणून सीएसआर फंडातून ४० ऑक्सिजन ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, याला पर्याय म्हणून सीएसआर फंडातून ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व २५ बायपॅप उपलब्ध करून दिल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बुधवारी दिली. जिल्ह्यातील पारगांव, राधानगरी व गडहिंग्लज येथे प्रत्येकी चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, आयजीएम इचलकरंजी येथे तीन, कोविड हॉस्पिटल शिरोळ येथे २५ कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. तसेच शासकीय रुग्णालय गडहिंग्लज येथे १०, कोविड हॉस्पिटल शिरोळ येथे ६ तर आयजीएम इचलकरंजी येथे ९ असे २५ बायपॅप देण्यात आले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी या वैद्यकीय उपकरणांचा वापर फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर उपलब्ध नसलेल्या किंवा कमी पडत असलेल्या रुग्णालयांमध्ये या उपकरणांचा मोठा उपयोग होणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभाग व शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत, जनतेनेही शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळल्यास या महामारीला आपण रोखू शकू असेही ते म्हणाले.
--