कोल्हापूरच्या ४० जणांचा सीए परीक्षेमध्ये झेंडा, कोल्हापूर विभागातून सौरभ पाटील प्रथम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:52 PM2024-07-12T13:52:42+5:302024-07-12T13:54:14+5:30

कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून सौरभ कुंडलिक पाटील ...

40 people from Kolhapur passed the CA exam, Saurabh Patil from Kolhapur division stands first | कोल्हापूरच्या ४० जणांचा सीए परीक्षेमध्ये झेंडा, कोल्हापूर विभागातून सौरभ पाटील प्रथम 

कोल्हापूरच्या ४० जणांचा सीए परीक्षेमध्ये झेंडा, कोल्हापूर विभागातून सौरभ पाटील प्रथम 

कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून सौरभ कुंडलिक पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अदिती विनायक पिसे यांनी दुसरा क्रमांक तर ओंकार अनिल चव्हाण यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ऋग्वेद अभिजित कपडेकर यांनी चौथा तर स्नेहल दीपक घोरपडे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. सीए परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी शहरातून ३२५ विद्यार्थी बसले होते. पैकी ४० जण सीए झाले.

या परीक्षेत अनुष्का चौगुले, ऋतुजा चौगुले, विक्रम पाटील, प्रथमेश सातोस्कर, पिंकी वाधवाणी, इम्रान पठाण, अदिती संकपाळ, सोनाली जाधव, साक्षी माने, प्रियांका कदम, प्रणव कुलकर्णी, भावेश पटेल, तेजस खाडे, अक्षय पाटील, श्रुती गायकवाड, श्रेया अडके, प्रतिभा नाळे, उमरावती पाटील, आशीर्वाद कुलकर्णी, मृणाल तेलंग, अवधूत नार्वेकर, मुक्तेश्वरी शिंदे, तेजस गांधी, अनिकेत शेंडुरे, स्वरूप पाटील, रोहित पाटील, युवराज सावंत-पाटील, शिवानी कुलकर्णी, सृष्टी भोसले, मानसी पाटील, निखिल डोर्ले, सोपान सावंत, अश्विन पटेल, यशपाल पाटील, अक्षय ताडे हे कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. 

त्यासह इंटरमिडिएट (द्वितीय वर्ष)चा ही निकालात कोल्हापूर विभागातून जय संजीव करोशी यांनी प्रथम क्रमांक आणि देशात ४९वा क्रमांक मिळवून कोल्हापूरचे नावलौकिक केल्याची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा तस्लीम आरिफ मुल्लाणी यांनी दिली.

Web Title: 40 people from Kolhapur passed the CA exam, Saurabh Patil from Kolhapur division stands first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.