गाडीअड्ड्यातील ४० गाळेधारकांना स्थलांतरित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:05+5:302021-02-05T07:17:05+5:30

कोल्हापूर : शहरातील गजबजलेल्या व्हीनस कॉर्नर चौकालगतच्या गाडीअड्ड्यातील चाळीस गाळेधारकांना लवकरच स्थलांतरित व्हावे लागणार आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी वाहनतळ ...

40 slum dwellers will be relocated | गाडीअड्ड्यातील ४० गाळेधारकांना स्थलांतरित करणार

गाडीअड्ड्यातील ४० गाळेधारकांना स्थलांतरित करणार

Next

कोल्हापूर : शहरातील गजबजलेल्या व्हीनस कॉर्नर चौकालगतच्या गाडीअड्ड्यातील चाळीस गाळेधारकांना लवकरच स्थलांतरित व्हावे लागणार आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी वाहनतळ विकसित करण्यात येणार असल्याने गाळेधारकांना स्थलांतरित करून तातडीने वाहनतळ जागेचे सपाटीकरण व डांबरीकरण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बुधवारी दुपारी प्रशासक बलकवडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गाडीअड्डा जागेची पाहणी केली. वाहनतळ तयार करण्यात येणाऱ्या अडचणींची माहिती करून घेतली. या परिसरात चाळीस गाळेधारक असून त्यांना महापालिकेनेच जागा भाडे तत्त्वावर दिली आहे. या गाळेधारकांच्या व्यवसायामुळे येथील सर्व जागा व्यापून गेली असल्याचे प्रशासक बलकवडे यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्व गाळेधारकांना जागा खाली करून द्यायला सांगा अशा सूचना दिल्या. तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या गाळेधारकांनी आम्हांला पर्यायी जागा दिल्यास तातडीने जागा खाली करून देतो असे सांगितले.

या वाहनतळावर सध्या किती वाहने थांबलेली असतात, असे विचारले असता, येथे कोणत्याही सुविधा नाहीत तसेच मंदिरापासून वाहनतळ लांब असल्याने सध्या कोणतीच वाहने थांबत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तेव्हा प्रशासक बलकवडे यांनी तातडीने सर्वच गाळेधारकांना स्थलांतर करावे, जागा मोकळी झाल्यानंतर त्या ठिकाणी सपाटीकरण तसेच डांबरीकरण करावे, अशा सूचना दिल्या.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मालमत्ता अधिकारी सचिन जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने उपस्थित होते.

फोटो क्रमांक - २८०१२०२१-गाडीअड्डा

ओळ - कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर येथील गाडीअड्डा वाहनतळाची बुधवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. यावेळी नितीन देसाई, नेत्रदीप सरनोबत, सचिन जाधव, आनंद माने, संजय शेटे उपस्थित होते.

Web Title: 40 slum dwellers will be relocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.