वडगावात कोविशिल्ड लसीचे ४०० डोस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:57+5:302021-04-11T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगावात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज आणखी एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगावात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज आणखी एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. शहरातील अधिकृत कोरोनाबाधित रुग्णांची २९ संख्या झाली आहे. यातील २० जणांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोविशिल्डचे ४०० डोस पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उद्यापासून लसीकरण मोहिमेस पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.
शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. शहरात दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कोरोना रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी होत आहे. पालिकेच्या बळवंतराव यादव हाॅस्पिटल व गिरीजा हाॅस्पिटल, कुडाळकर हाॅस्पिटल येथे कोरोना लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ३४३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पालिकेच्या लसीकरण केंद्रास प्रांताधिकारी डाॅ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी भेट दिली होती.