पावनगडावर सापडले ४०६ तोफगोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:20+5:302021-02-06T04:43:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पन्हाळा : पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर दिशादर्शक ...

406 artillery shells found at Pavangada | पावनगडावर सापडले ४०६ तोफगोळे

पावनगडावर सापडले ४०६ तोफगोळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पन्हाळा : पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर दिशादर्शक फलक लावताना खोदकामात ४०६ तोफगोळे सापडले. हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. वनविभागाच्या परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका दळवी यांनी ही माहिती दिली.

पावनगडावर काही दिवसांपासून तुपाची विहीर, निरनिराळी देवळे व विहिरी अशा ठिकाणी वनविभागामार्फत दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. यासाठी कोल्हापूरमधील काही युवक मदत करत आहेत. गुरुवारी सकाळी महादेव मंदिराजवळ दिशादर्शक फलक लावण्यासाठी खोदकाम करताना तीन फुटावर काही दगडी तोफगोळे सापडले. कुतूहल म्हणून आणखी खोदले असता, सुमारे ४०६ लहान-मोठे तोफगोळे सापडले. ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि पावनगडावर बघ्यांची गर्दी झाली होती. पावनगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत: बांधला आहे. आता हा गड वनविभागाच्या ताब्यात आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, पूर्वीच्याकाळी तोफगोळे सापडलेल्या ठिकाणी दारूगोळ्यांचे कोठार होते, असे म्हटले जाते.

वनविभागाचे अधिकारी, सहाय्यक वन संरक्षक एस. डी. निकम यांनी भेट देऊन या ठिकाणचा पंचनामा करून हे तोफगोळे ताब्यात घेतले असून, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ते पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केले जातील, असे सांगितले.

फोटो

०४ पन्हाळा तोफगोळे

------- तोफगोळे सापडलेले

Web Title: 406 artillery shells found at Pavangada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.