निपाणीत २ महिन्यांत कोरोनाने ४२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:59+5:302021-06-05T04:17:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : दादा जनवाडे : निपाणी तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मृत्यूदरही वाढीस ...

42 deaths due to corona in 2 months in Nipani | निपाणीत २ महिन्यांत कोरोनाने ४२ मृत्यू

निपाणीत २ महिन्यांत कोरोनाने ४२ मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : दादा जनवाडे :

निपाणी तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मृत्यूदरही वाढीस लागला आहे. निपाणी परिसरात १ एप्रिल २०२१ नंतर आतापर्यंत ४२ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, तालुक्यात कोरोना न झालेल्या १५६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर तालुक्यात आतापर्यंत ४१ हजार ६३१ लोकांना लसीकरण झाले आहेत.

निपाणी तालुका हा महाराष्ट्राशी निगडित असल्याने सुरुवातीपासून प्रशासनाने काळजी घेतली होती. तरीही निपाणी तालुक्यात कोरोनाने एंट्री करत थैमान घातले आहे. निपाणी तालुका प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. अशा परिस्थितीत निपाणी तालुक्यात दोन महिन्यांत ४२ मृत्यू झाल्याची नोंद निपाणी तालुका प्रशासनाकडे आहे. तालुका प्रशासनाने काळजी घेऊनही रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.

तालुक्यात नेमके मृत्यू किती?

तालुका प्रशासनाकडे एक एप्रिलपासून केवळ ४२ मृत्यू कोरोनाने झाल्याची नोंद आहे. निपाणीत कोरोना मृतांवर मोफत अंत्यंस्कार करणाऱ्या एका सामाजिक संस्थेने ११२ मृतांवर केले आहेत. यामुळे प्रशासनाकडे नोंद असलेल्या आकड्यांबाबत सांशकता निर्माण झाली आहे.

निपाणी तालुका

एकूण लसीकरण : ४१६३१ एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : ५५० कोरोनाने मृत्यू : ४२ (१ एप्रिल नंतर) नैसर्गिक मृत्यू : १५६ (१ एप्रिल नंतर)

चिकोडी तालुका

एकूण सापडलेले रुग्ण : १४८० (१७ मार्च नंतर) एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : ६०३ कोरोनाने मृत्यू : १०० (१७ मार्च नंतर) एकूण टेस्ट : १० हजार अधिक

संग्रहित फोटो वापरवा

Web Title: 42 deaths due to corona in 2 months in Nipani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.