इचलकरंजीत ४२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:51+5:302021-07-15T04:18:51+5:30
इचलकरंजी : शहरात बुधवारी विविध ३० भागातील ४२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू ...
इचलकरंजी : शहरात बुधवारी विविध ३० भागातील ४२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहापूर ६, विक्रमनगर ३, सुतार मळा, राजराजेश्वरीनगर, जुना चंदूर रोड, कमला नेहरू हाऊसिंग सोसायटी, स्वामी अपार्टमेंट, गणेशनगर प्रत्येकी २, गावभाग, चांदणी चौक, श्रीपादनगर, सुंदर बागेजवळ, धान्य ओळ, नामदेव भवनजवळ, तांबे मळा, कोरवी गल्ली, रोहिदासनगर, वृंदावन कॉलनी, सहकारनगर, आमराई रोड, कागवाडे मळा, लक्ष्मी-व्यंकटेशनगर, पुजारी मळा, मुरदंडे मळा, जिव्हेश्वर मंदिरजवळ, यशवंत कॉलनी, हनुमाननगर, डेक्कन मिलजवळ, तोरणानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार ६४३ जणांना लागण झाली असून, सात हजार ८८२ जण बरे झाले आहेत. ३७८ जण उपचार घेत असून, मृत्यूसंख्या ३८३ वर स्थिर आहे.