विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील ४२ विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:26+5:302021-01-13T04:58:26+5:30
या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये २०१९-२०२० मध्ये विविध उद्योग संस्था कॅम्पस् ड्राइव्ह घेतला. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केशव शिंदे, प्रसाद ...
या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये २०१९-२०२० मध्ये विविध उद्योग संस्था कॅम्पस् ड्राइव्ह घेतला. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केशव शिंदे, प्रसाद चौधरी, हर्षवर्धन पाटील, वृषाली सावंत, निखिल पत्रावळे, प्रेरणा राजपूत, अमोल देवकाते, वैभव पाटील, ललित ढाणे, ओंकार कोष्टी, ऋषिकेश नलवडे, वेदांत दाविले, अंकिता श्रींगारे, ऐश्वर्या चव्हाण, सिध्दांत खर्डेकर, वेद इंगलेश्वर, नीलेश हलगे, विश्वजित घाटगे, वैभव गुंजाटे, सुरज मस्के, अनिकेत भोसले, शुभम हावळे, सदानंद जाधव, सुरेश कुमार राय, सूचिता तोरानेवाले, शंतनू बलसे, अंगद चोपडे, सौरभ घाटगे, शिवम चंगोत्रा, शिल्पा बोंबले, अखिल सलगोत्रा, आकाश भोसले, श्रुती लटे, कल्याणी पवार, पोरस जाधव, राजवर्धन कुलकर्णी, शुभम कुलकर्णी, संजय गावडे यांचा समावेश आहे. त्यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांना औदयोगिक क्षेत्राची ओळख करून देऊन त्यांचा वैयक्तिक विकास घडविणे, त्यांना करिअर निवडण्याचे पूर्वज्ञान मिळावे, यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून करिअर विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तंत्रज्ञान अधिविभाग औदयोगिक ज्ञान, संशोधनामध्ये उत्कृष्ट गुणवत्तेचे केंद्र बनावे, यासाठी आम्ही कार्यरत आहोत.
- डॉ. जयदीप बागी, संचालक, तंत्रज्ञान अधिविभाग
आकडेवारी दृष्टिक्षेपात
शाखानिहाय निवड झालेले विद्यार्थी
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग : ६
मेकॅनिकल इंजिनिअरिंग : ५
कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी : २२
फूड टेक्नॉलॉजी : ४
केमिकल इंजिनिअरिंग : ५