करवीरमधील ४२ हजार चौरस मीटर जमिनी ब सत्तामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:26 AM2021-08-15T04:26:17+5:302021-08-15T04:26:17+5:30

कोल्हापूर : करवीरमधील वॉर्ड ई १ व २ मधील ४२ हजार ५५४.९५ चौरस मीटर जमिनीवरील ब सत्ता प्रकार कमी ...

42,000 square meters of land in Karveer is out of power | करवीरमधील ४२ हजार चौरस मीटर जमिनी ब सत्तामुक्त

करवीरमधील ४२ हजार चौरस मीटर जमिनी ब सत्तामुक्त

Next

कोल्हापूर : करवीरमधील वॉर्ड ई १ व २ मधील ४२ हजार ५५४.९५ चौरस मीटर जमिनीवरील ब सत्ता प्रकार कमी करून ही जमीन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शासनाच्या बंधनातून मुक्त करण्यात आली. प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी याबाबतचे आदेश काढले असून त्याचा १ हजार ४४ मिळकतधारकांना लाभ झाला आहे. राज्यात केवळ कोल्हापूर जिल्ह्यात हजारो नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राबवली जात असलेली अशी एकमेव मोहीम आहे.

जिल्ह्यातील अनेक जमिनींवर नोंदणीच्या चुकीतून ब सत्ता प्रकार लावण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना कोणतेही बांधकाम, विकासकामे करायची असतील, खरेदी-विक्री, कर्ज प्रकरणे करायची असतील तर जिल्हा प्रशासनाची मान्यता घ्यावी लागायची. ब सत्ता प्रकार कमी करायचा असेल तर कागदपत्रांची पूर्तता आणि सगळी किचकट प्रक्रिया पार पाडत बसावी लागायची, यामध्ये नागरिकांचा वेळ आणि श्रमही खूप जातो. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाने स्वत: पुढाकार घेऊन ज्या जमिनींवर अशा चुकून नोंदणी झाल्या आहेत, त्या जमिनींवरील ब सत्ता प्रकार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर हे स्वत: लक्ष घालून ही मोहीम यशस्वी करत आहेत. याअंतर्गत शुक्रवारी करवीरमधील ई वाॅर्ड १ व २ मधील १ हजार ४४ मिळकतधारकांच्या ४२ हजार ५५४.९५ चौरस मीटर जमिनीवरील ब सत्ता प्रकार कमी करण्यात आला आहे.

राज्यात केवळ कोल्हापूर जिल्ह्यात हजारो नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राबवली जात असलेली अशी एकमेव मोहीम आहे. विशेषत: करवीरमध्ये ती अधिक यशस्वी झाली आहे.

-----

काही महिन्यांपूर्वी मातंग वसाहतीतील जमिनीदेखील अशाच बंधमुक्त करण्यात आल्या होत्या. येथीलच आणखी ५३ मिळकतधारकांनी जमिनीच्या मालकीसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३३ प्रॉपर्टी कार्डवर चुकून लागलेला ब सत्ता प्रकार कमी करण्यात आला. त्याचे क्षेत्रफळ ५ हजार ६७८ चौरस मीटर इतके आहे.

----

Web Title: 42,000 square meters of land in Karveer is out of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.