गोकुळ दूध संघामध्ये ४२९ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:35 AM2018-04-27T00:35:47+5:302018-04-27T00:35:47+5:30

429 employees recruitment ghats in Gokul milk team | गोकुळ दूध संघामध्ये ४२९ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा घाट

गोकुळ दूध संघामध्ये ४२९ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा घाट

googlenewsNext


कोल्हापूर : गाईच्या वाढत्या दुधाच्या हाताळणीमुळे ‘गोकुळ’ला तोटा होत असताना, नवीन ४२९ कर्मचारी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे वर्षाला दूध उत्पादकांचे ११ कोटी रुपये पगारापोटी खर्च होणार आहेत. याची खरोखरच गरज आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
शासनाच्या निर्णयानंतरही गाईच्या दूध खरेदी दरात कपात केल्याप्रकरणी विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी बुधवारी ‘गोकुळ’च्या संचालकांना अपात्र का करू नये, अशी नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली. आमदार पाटील म्हणाले, किमान नोटीस काढली म्हणून पहिल्यांदा शासनाचे अभिनंदन करतो. आता योग्य प्रकारे चौकशी करून शासनाने संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे. ‘गोकुळ’ने २०२० पर्यंत रोज २० लाख लिटर दुधाची हाताळणी करण्यासाठी आणखी ४२९ पदे भरण्याची शासनाकडून मंजुरी घेतली आहे. मात्र, एकूणच या भरतीला आपला आक्षेप आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले, मुळात गाईचे दूध वाढत असताना, या हाताळणीमुळे ‘गोकुळ’ला तोटा होत असल्याचे सांगितले जात आहे. असे असताना मग पुन्हा नोकरभरती गरजेची आहे का, ती करणे खरोखरच गरजेचे आहे का, याची चौकशी शासनाने केली पाहिजे. सातारा, पुणे जिल्हा बँकेने ज्या पद्धतीने जाहिराती देऊन कर्मचारी भरती केली आहे. त्या पद्धतीने वृत्तपत्रांना जाहिराती देऊन ही भरती झाली पाहिजे. या भरतीमुळे वर्षाला सुमारे ११ कोटी रुपये बोजा पडणार असून, हा खर्च दुध उत्पादकांच्याच माथ्यावर पडणार आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी यावेळी या कर्मचारी भरतीमध्ये लाखो रुपयांची चर्चा सुरू असून, १०, १२ दूध संस्थांचे ठराव एकत्र आणल्यास एक जागा या पद्धतीनेही नोकरभरतीची आश्वासने दिली जात असल्याचा आरोप केला. यावेळी ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, कुंभी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, सरवडेचे विजयसिंह मोरे उपस्थित होते.
‘गोकुळ’च्या चौकशीबाबत
जानकर यांना स्मरणपत्र
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ’मधील भ्रष्ट कारभाराची, लेखापरीक्षण अहवाल आणि बेकायदेशीर वार्षिक सर्वसाधारण सभेची शासनाने चौकशी करावी अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी केली होती. यावेळी दोन तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आश्वासन पशूसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. आय. ए. एस. अधिकाºयाकरवी या सर्व मुद्द्यांची चौकशी करावी यासाठी जानकर यांना पहिले स्मरणपत्र १४ एप्रिलला पाठविण्यात आले आहे.
शेतकºयांना फसवलं हे तरी जाहीर करा...!
गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचे आदेश शासनाने दिले असताना ‘गोकुळ’सह अनेक संघांनी या आदेशाचे पालन केले नाही. यावर सरकार या संघांवर कारवाई करीत नाही. एक तर शासनाने संघांना दरवाढ देणे बंधनकारक करावे न केल्यास कारवाई करावी. तेही जमत नसल्यास आम्ही शेतकºयांना फसविले, हे तरी जाहीर करावे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
अध्यक्षांच्या दारात जनावरांसह बसणार
‘गोकुळ’ला मिळणाºया रुपयातील ७० पैशांहून अधिक पैसे आम्ही शेतकºयांवर खर्च करतो, असे वारंवार अध्यक्ष सांगत असतात; परंतु हे खोटे आहे. आता पुन्हा त्यांनी जर हेच सांगायला सुरुवात केली तर जनावरांसह त्यांच्या दारात ठिय्या मारणार असल्याचे बाबासाहेब देवकर यांनी सांगितले. काही संचालकांकडे एक गाय आणि म्हैसही नाही त्यांना दूध उत्पादकांचे दुखणे काय कळणार ? असाही प्रश्न देवकर यांनी उपस्थित केला.

Web Title: 429 employees recruitment ghats in Gokul milk team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.