जिल्ह्यातील ४३१४ विद्यार्थ्यांनी दिली एनटीएस परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 10:37 AM2020-12-14T10:37:10+5:302020-12-14T10:39:04+5:30
Exam, Student, Education Sector, kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.
प्रायव्हेट हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, शिवराज विद्यालय, भोगावती हायस्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल, आदी १८ केंद्रांवर परीक्षा झाली. सकाळी १०.३० ते दुपारी साडेबारा या वेळेत ह्यमॅटह्णचा पहिला, तर दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ह्यसॅटह्णचा पेपर झाला.
पहिल्या पेपरमध्ये बौद्धिक क्षमतेवरील आणि दुसऱ्या पेपरमध्ये अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न होते. दरम्यान, या परीक्षेची तयारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली. केंद्र संचालकांची सभा घेतली. एकूण ४४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सर्व केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.
आवश्यक ती दक्षता
या परीक्षेदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी स्वरूपांतील आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. परीक्षार्थी, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांची हमीपत्रे घेतल्याचे लोहार यांनी सांगितले.