‘रवळनाथ’च्या सभासदांना ४५ लाखांचे जादा शेअर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:36 AM2020-12-14T04:36:52+5:302020-12-14T04:36:52+5:30
गडहिंग्लज : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक वर्षाला १०० प्रमाणे ७५४२ सभासदांना ४५ लाख २७ हजारांचे जादा शेअर्स देणार आहोत, अशी ...
गडहिंग्लज : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक वर्षाला १०० प्रमाणे ७५४२ सभासदांना ४५ लाख २७ हजारांचे जादा शेअर्स देणार आहोत, अशी घोषणा श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी २४ व्या वार्षिक सभेत केली.
यावेळी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले सभासद, सेवानिवृत्त सभासद आणि दहावी-बारावी व पदव्युत्तर पदवी संपादित केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार झाला.
कराड व पुणे येथे नवीन शाखा सुरू करण्यासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी मिळाली. चौगुले म्हणाले, सर्व शाखेत मायक्रो एटीएमची सुविधा उपलब्ध करून देणार असून, अॅपद्वारे बँकिंग सेवा अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न आहे.
संचालक रामचंद्र निळपणकर, महादेव पाटील, किरण पोतदार, सुशांत करोशे, प्रदीप अभ्यंकर, नंदकुमार शेळके यांनी आर्थिकपत्रके वाचली. सीईओ दत्तात्रय मायदेव यांनी विषयपत्रिका, तर व्यवस्थापक शिवानंद घुगरे यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचला. संचालक शिवशंकर उपासे, नवनाथ शिंदे, समिधा चौगुले व सविता पाटील, शाखाध्यक्ष जनार्दन केसरकर, रामचंद्र पाटील, प्रकाश हेरेकर, कुमार पाटील, राजाराम पाटील व विद्या बांदिवडेकर उपस्थित होते. दत्ता पाटील यांनी सूत्रसंचलन केले. उपाध्यक्ष वासुदेव मायदेव यांनी आभार मानले.
---------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ‘रवळनाथ’च्या वार्षिक सभेत संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक व शाखाध्यक्ष उपस्थित होते.
क्रमांक : १३१२२०२०-गड-०९