Kolhapur: शिक्षिकेकडून घेतली ४५ हजार रुपयाची लाच; संस्थाचालकासह मुख्याध्यापक, शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:32 PM2023-08-23T19:32:36+5:302023-08-23T19:33:14+5:30
जयसिंगपूर : शिक्षिकेकडून ४५ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी जयसिंगपूर शहराजवळील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आण्णासाहेब विभूते धरणगुत्ती विद्यामंदिर ...
जयसिंगपूर : शिक्षिकेकडून ४५ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी जयसिंगपूर शहराजवळील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आण्णासाहेब विभूते धरणगुत्ती विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक व शिपाई यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
संस्थेचे अध्यक्ष अजित उध्दव सुर्यवंशी (रा.धनराज वसाहत अपार्टमेंट, राजवाडा, सांगली, मुळगांव पारा, ता.विटा), मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील (वय ५७, रा.धरणगुत्ती, ता.शिरोळ) व शिपाई अनिल बाळासोा टकले (वय ५१, रा.नदीवेस राममंदिरजवळ, इचलकरंजी) अशी संशयीतांची नावे असून यातील मुख्याध्यापक व शिपायाला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई आज, बुधवारी करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलिस कर्मचारी प्रकाश भंडारे, विकास माने यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.