जिल्ह्यात ४५३ गावांत कर्जमाफी रेंगाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:33 AM2017-09-27T00:33:47+5:302017-09-27T00:33:47+5:30

In the 453 villages, the debt waiver will be lagged | जिल्ह्यात ४५३ गावांत कर्जमाफी रेंगाळणार

जिल्ह्यात ४५३ गावांत कर्जमाफी रेंगाळणार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.
कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक ३ लाख ४७ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे, तर १ लाख ८८ कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. आता सहकार विभागाकडून सोसायटीकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी सुरु आहे. ज्या शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांची माहिती २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन करून जनतेसमोर आणली जाणार आहे. मात्र आता यातील ४५३ गावांसमोर आचारसंहितेची अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका सुरू असलेल्या या गावांमध्ये चावडी वाचन तूर्त करू नये, अशा सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. आचारसंहिता नसलेल्या गावांमध्ये २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरू होईल. उर्वरित ४५३ गावांमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ते होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमधील चावडी वाचनाचे नियोजन जिल्हा उपनिबंधकांमार्फत करण्यात आले होते. आता आचारसंहितेमुळे दोन टप्प्यात चावडी वाचन प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे दिवाळीपर्यंत या गावांमधील शेतकºयांना कर्जमाफी मिळणे मुश्किल होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडूनही शासनाने याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे समजते. तोपर्यंत सहकार विभागाने खबरदारी म्हणून तूर्त ग्रामपंचायत निवडणुका नसलेल्या गावांमध्येच चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुमारे २ लाख ५७ हजार जण पात्र आहेत. जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार वैयक्तिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये १ लाख ८८ हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. सहकार विभागाकडून सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ७६३ सोसायट्या आहेत. लेखापरीक्षकांमार्फत ११८ सोसायट्यांमधील कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी दहा दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने तीन समित्यांची नेमणूक केली आहे. २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरु होणार आहे. प्रत्येक तालुक्याला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या समितीवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती पडताळण्याचे, चौकशी करण्याचे काम या समितीतील सदस्य करणार आहेत. तसेच एखादा अर्जदार कर्जमाफीस पात्र आहे की अपात्र आहे, याचा निर्णय ही समिती घेणार आहे.

Web Title: In the 453 villages, the debt waiver will be lagged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.