शेती पाणीपट्टीची थकबाकी ४६ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:51 PM2019-03-10T23:51:00+5:302019-03-10T23:51:05+5:30
नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतीसाठी दिलेल्या पाणीपट्टीची थकबाकी वर्षागणिक वाढतच चालली असून, ती आता ४६ कोटी ...
नसिम सनदी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतीसाठी दिलेल्या पाणीपट्टीची थकबाकी वर्षागणिक वाढतच चालली असून, ती आता ४६ कोटी ६८ लाखांवर पोहोचली आहे. वसुलीसाठी पाटबंधारे विभागाकडून मोठा गाजावाजा होत असला तरी शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. २० रुपये लिटरने बाटलीबंद पाणी एका बाजूला विकले जात असताना शेतीसाठी मात्र १३ रुपये ८० पैसे प्रतिगुंठा असे वर्षभर पाणी वापरूनही पैसे भरण्यास का टाळाटाळ होतेय, असा प्रश्न वसुली अधिकाऱ्यांना पडला आहे.
कोल्हापूर पाटबंधारे विभागांतर्गत दक्षिण व उत्तर अशी दोन परिमंडळे करण्यात आली आहेत. दक्षिण परिमंडळात दूधगंगा हा मोठा प्रकल्प; पाटगाव, चिकोत्रा, फाटकवाडी, जंगमहट्टी, जांबरे, चित्री, सर्फनाला, आंबेओहोळ असे मध्यम प्रकल्प व काही लघुप्रकल्पांचा समावेश आहे. उत्तर परिमंडळात राधानगरी, तुळशी, दूधगंगा, वारणा हे चार मोठे प्रकल्प, कडवी, कासारी, कुंभी व धामणी हे चार मध्यम प्रकल्प व २३ लघुप्रकल्पांचा समावेश होतो.
‘पाटबंधारे’च्या उत्तर व दक्षिण या दोन्ही परिमंडळांतून जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी पुरविले जाते. दक्षिण विभागाची यावर्षी पाणीपट्टी स्थानिक उपकरासह ६२ कोटी ११ लाखांची आहे. त्यांपैकी २३ कोटी १६ लाख ९१ हजारांची पाणीपट्टी थकीत आहे. उत्तर विभागातूनही २३ कोटी ५२ लाखांची थकबाकी आहे. दक्षिण विभागात जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींचा समावेश होतो. त्यांची एकत्रित थकबाकी ७२ कोटी १७ लाख आहे. त्यापैकी ११ कोटी ६ लाख ६८ हजारांची वसुली झाली असून उर्वरित रक्कम मार्च २०१८ पासून थकीत आहे. उत्तर विभागातूनही महापालिकेचे २४ कोटी रुपये थकीत असून, त्याचा न्यायालयीन वाद सुरू आहे.
1 थकबाकीचा आकडा वाढण्यामागे शेतकºयांची अनास्था जशी कारणीभूत आहे, तशीच ‘पाटबंधारे’तील अधिकाºयांची मानसिकताही कारणीभूत आहे. विशेषत: उत्तर विभागातील अधिकाºयांची मानसिकता कोणालाही न जुमानण्याची असल्याने शेतकरीही पाणीपट्टीसाठी येणाºया वसुली पथकाला मदत करताना दिसत नाहीत.
2 या प्रकल्पातून नदी, विहीर, कालवा या ठिकाणांहून लिफ्ट इरिगेशनने पाणी उचलून शेतीला पुरविण्यासाठी शेतकºयांना पाटबंधारे विभागाकडून एकरी ५५२ रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. म्हणजे वर्षाला गुंठ्याला
१३ रुपये ८० पैसे इतका दर पडतो.