जिल्ह्यात ४६१ उमेदवारी अर्ज अवैध

By admin | Published: November 3, 2016 01:24 AM2016-11-03T01:24:15+5:302016-11-03T01:24:15+5:30

नगरपालिका निवडणूक : नगराध्यक्षपदाचे ८२, तर नगरसेवकपदासाठी १२६0 अर्ज वैध

461 nomination papers invalid in district | जिल्ह्यात ४६१ उमेदवारी अर्ज अवैध

जिल्ह्यात ४६१ उमेदवारी अर्ज अवैध

Next

 
कोल्हापूर : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी भरलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सकाळी ११ वा. पासून सुरु होती. त्या - त्या नगरपालिकांच्या ठिकाणी झालेल्या छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी आलेल्या एकूण १३६ अर्जांपैकी ८२ वैध तर ५४ अर्ज अवैध ठरले. तर नगरसेवकपदासाठी आलेल्या एकूण १६७५ अर्जांपैकी १२६८ वैध तर ४0७ अर्ज अवैध ठरले. इचलकरंजी आणि गडहिंग्लजमध्ये तांत्रिक मुद्यावरुन उमेदवारांच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यामुळे छाननी प्रक्रिया लांबली. अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवार ११ नोव्हेंबर असून दुपारी ३ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल.
इचलकरंजी पालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १७ अर्जापैकी १0 वैध तर ७ अर्ज अवैध ठरले आहेत. ६२ जागांसाठी नगरसेवकपदाचे विक्रमी ३४२ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३६९ अर्ज वैध तर ७४ अर्ज अवैध ठरले. गडहिंग्लजमध्ये नगराध्यक्षपदाच्या १७ अर्जांपैकी १४ वैध ठरले असून, ३ अवैध ठरले. १७ जागांसाठी नगरसेवकपदाच्या २१६ पैकी १५६ वैध तर ६0 अवैध ठरले आहेत. दोन्हीही ठिकाणी तांत्रिक मुद्यावरुन उमेदवारांच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यामुळे छाननी प्रक्रिया लांबली. जयसिंगपूर पालिकेत नगराध्यक्षपदासाठी सर्व १२ अर्ज वैध ठरले. तर नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी २३४ अर्जापैकी २२८ वैध तर ६ अवैध ठरले. यात अनेकांनी दुबार अर्ज दाखल केले आहेत. कागल नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ४0 पैकी ७ वैध तर ३३ अर्ज अवैध ठरले. तर २0 जागांसाठी आलेल्या ३0४ पैकी १२0 अर्ज वैध ठरले. येथे आले होते. येथे मान्यताप्राप्त पक्षांनी दिलेल्या एबी फॉर्ममुळे बऱ्यापैकी अर्ज छाननीत बाद ठरले.
मंडलिक गटाबरोबर युती झाल्याने मुश्रीफ गटाने पाच ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे २० पैकी १५ उमेदवारच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढतील. पन्हाळा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षसाठी सर्व ४ ठरले.
यामध्ये तेजस्विनी गुरव यांनी दुबार अर्ज भरला आहे. १७ जागांसाठी नगरसेवक पदाचे सर्व ४९ अर्ज वैध ठरले असून आठ जणांनी दुबार अर्ज भरले आहेत.
कुरुंदवाड पालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचे सर्व १२, तर १७ जागांसाठी नगरसेवकपदाचे १२८ पैकी १२७ अर्ज वैध ठरले. वडगाव पालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचा एक अर्ज अवैध तर ६ वैध आणि नगरसेवकपदांचे ४ अवैध तर ७५ अर्ज वैध ठरले.
मुरगुड पालिकेमध्ये नगराध्यक्षसाठी २२ पैकी १४ अर्ज वैध तर १७ जागांसाठी नगरसेवकचे १६८ पैकी १0२ अर्ज वैध ठरले. येथे नगराध्यक्ष, नगरसेवकसाठी अनु. ६६ व ८ अर्ज अवैध ठरले. मलकापूर पालिकेत नगराध्यक्षपदाचे ५ पैकी ३ अर्ज वैध ठरले. तर १७ जागांसाठी नगरसेवकपदाचे दाखल झालेल्या ६५ पैकी ५३ जणांचे अर्ज वैध तर १२ जणांचे अवैध ठरले.
इचलकरंजीत लतीफ गैबान बिनविरोध
इचलकरंजीत ताराराणी आघाडीला प्रभाग ४ अ मध्ये धक्का बसला असून, उमेदवार मुसीफ अल्लाउद्दीन मुल्ला यांचा जातप्रमाणपत्र दाखला नसल्याने, तर दुसरे उमेदवार शाबुद्दीन सय्यद यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राचे विवरण जोडले नसल्याने दोन्ही अर्ज अवैध ठरले. त्यामुळे तेथील राष्ट्रवादीचे उमेदवार लतीफ गैबान यांचा एकमात्र अर्ज बाकी राहिला. परिणामी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा २८ नोव्हेंबर रोजीच केली जाणार आहे.
 

Web Title: 461 nomination papers invalid in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.