कोल्हापुरात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण, संख्या लागली वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 08:05 PM2021-02-23T20:05:20+5:302021-02-23T20:06:53+5:30

corona virus Kolhapur- गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात नवे ४७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी कोल्हापूर शहरामधीलच तब्बल ३२ रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रात तीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५० हजार २५३ पॉझीटिव्हपैकी ४८ हजार ३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १७५ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एकूण १ हजार ७३८ जणांचा मृत्यू झाला.

47 new patients in Kolhapur, the number of patients started increasing | कोल्हापुरात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण, संख्या लागली वाढू

कोल्हापुरात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण, संख्या लागली वाढू

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण, संख्या लागली वाढूलोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज

कोल्हापूर : गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात नवे ४७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी कोल्हापूर शहरामधीलच तब्बल ३२ रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रात तीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५० हजार २५३ पॉझीटिव्हपैकी ४८ हजार ३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १७५ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एकूण १ हजार ७३८ जणांचा मृत्यू झाला.

आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त ४७ पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-१, गडहिंग्लज-१, हातकणंगले-२, कागल-१, करवीर-१, पन्हाळा-१, नगरपरिषद क्षेत्र- ३, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३२ व इतर जिल्हा व राज्यातील ५ नवे रुग्ण आढळले आहेत.

दिवसभरात १३९ जणांची आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी तपासणी करण्यात आली असून ११४ अहवाल निगेटिव्ह तर १४ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यातील ११ अहवाल नाकारण्यात आले आहेत. ११२ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून पैकी १०६ अहवाल निगेटिव्ह तर ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. खासगी रुग्णालये, लॅब मध्ये २०१ अहवालापैकी १७४ निगेटिव्ह तर २७ पॉझीटिव्ह असे एकूण ४७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

आजअखेर रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

आजरा-८८७, भुदरगड- १२३६, चंदगड- १२२८, गडहिंग्लज- १५०६, गगनबावडा- १५२, हातकणंगले-५३२५, कागल-१६८४, करवीर-५७३२, पन्हाळा- १८७१, राधानगरी-१२५४, शाहूवाडी-१३६३, शिरोळ- २५१२, नगरपरिषद क्षेत्र-७५१३, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १५ हजार ५३२ असे एकूण ४७ हजार ७९५ आणि इतर जिल्हा व राज्यातील -२ हजार ४५८ असे मिळून एकूण ५० हजार २५३ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Web Title: 47 new patients in Kolhapur, the number of patients started increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.