ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मार्गशीर्ष गुुरुवारचा मुहूर्त, ४८१ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:29 PM2020-12-24T20:29:58+5:302020-12-24T20:32:56+5:30

gram panchayat Elecation Kolhapur- मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ४८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक संख्या करवीर आणि त्यानंतर कागलची आहे. गेल्या दोन दिवसांत ५०७ व्यक्तींनी ५१७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

481 applications filed on the occasion of Margashirsha Thursday; Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मार्गशीर्ष गुुरुवारचा मुहूर्त, ४८१ अर्ज दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मार्गशीर्ष गुुरुवारचा मुहूर्त, ४८१ अर्ज दाखल

Next
ठळक मुद्देमार्गशीर्ष गुुरुवारचा मुहूर्त साधून ४८१ अर्ज दाखल; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुुरुवारचा मुहूर्त

 कोल्हापूर : मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ४८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक संख्या करवीर आणि त्यानंतर कागलची आहे. गेल्या दोन दिवसांत ५०७ व्यक्तींनी ५१७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी २६, तर गुरुवारी तब्बल ४८१ व्यक्तींनी ४९१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा दिवस साधून अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरले.


आलेले अर्ज तालुकानिहाय

तालुका : व्यक्ती अर्ज

  • शाहूवाडी : ९ : ९
  • पन्हाळा : ५३ : ५३
  • हातकणंगले : ५२ : ५२
  • शिरोळ : ७३ : ७३
  • करवीर : ९३ : ९९
  • गगनबावडा : ० : ०
  • राधानगरी : ५३ : ५३
  • कागल : ६८ : ६८
  • भुदरगड : २१ : २२
  • आजरा : १६ : १६
  • गड़हिंग्लज : २७ : २९
  • चंदगड : १६ : १७


 

Web Title: 481 applications filed on the occasion of Margashirsha Thursday; Gram Panchayat Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.