कांचनवाडी - हसूर फाटा रस्त्यासाठी ४.८७ कोटी - पी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:50+5:302021-05-25T04:25:50+5:30
कोल्हापूर : करवीर व राधानगरी तालुक्यातील अनेक गावांना जवळचा व सोयीचा मार्ग ठरणाऱ्या कांचनवाडी ते हसूर फाटा रस्त्यासाठी केंद्रीय ...
कोल्हापूर : करवीर व राधानगरी तालुक्यातील अनेक गावांना जवळचा व सोयीचा मार्ग ठरणाऱ्या कांचनवाडी ते हसूर फाटा रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधीतून ४ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये निधी मंजूर केल्याची माहिती आमदार पी. एन. पाटील यांनी पत्रकातून दिली.
चांदे (ता. राधानगरी), कांचनवाडी, भाटणवाडी, हसूर दुमाला, कुरुकली ते येवती फाटा हा अकरा किलोमीटरचा रस्ता गगनबावडा, तुळशी, धामणी व भोगावती खोऱ्याला जोडला जातो. या रस्त्याची गेली अनेक वर्षे मागणी होत होती. या रस्त्याच्या निधीसाठी आमदार पाटील यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ३१ हजार निधी मंजुरीचे पत्र मंत्री गडकरी यांनी आपणाला पाठविल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.